Join us  

विक्रमांचा पाऊस,  'अशी' कामगिरी करणारे धोनी-रोहित पहिलेच

काल भारताने आठवा मालिका विजय मिळवला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 8:43 AM

Open in App

ब्रिस्टॉल : ‘हीटमॅन’ रोहित शर्माचे नाबाद शतक आणि हार्दिक पांड्याची शानदार अष्टपैलू खेळी या जोरावर भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी20 सामन्यात इंग्लंडचा 7 गड्यांनी धुव्वा उडवत तीन सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला. ब्रिस्टॉल येथे झालेल्या निर्णायक सामन्यात विक्रमांची बरसात झाली. रोहित शर्माने तिसरे टी20 शतक झळकावले तर यष्टीमागे धोनीने 54 फलंदाजांना बाद केले. जाणून घेऊयात काल झालेले विक्रम. 

एका सामन्यापेक्षा आधिक सामने असलेल्या मालिकेत भारताने ऑगस्ट 2016 मध्ये वेस्ट इंडिजकडून शेवटचा पराभव पाहिला होता. तेव्हापासून विराटसेना अपाराजित आहे.  भारतीय संघाचा हा सलग सहावा मालिका विजय आहे. 

तीन सामन्याची टी-20 मालिकेत भारत आजतागत अपारजित आहे. काल भारताने आठवा मालिका विजय मिळवला. 

रोहित शर्माने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात नाबाद शतक झळकावत भारताचा विजय साकारला. त्यासोबतच रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा टप्पाही पार केला. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय, तर जगातील पाचवा फलंदाज ठरला. रोहितआधी कर्णधार विराट कोहलीने अशी कामगिरी केली आहे.

रोहित शर्माने काल झालेल्या सामन्यात आतंरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील तिसरे शतक झळकावले. भारतीय संघासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू म्हणून रोहित शर्माची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कॉलिन मुनरोनंतर तीन शतके झळकावणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू. 

महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटवर आपली छाप पाडत दोन विक्रम रचले. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात धोनीने पाच झेल घेतले. टी20 मध्ये पाच यष्टीमागे पाच झेल घेणारा धोनी एकमेव खेळाडू बनला आहे. काल झालेल्या सामन्यात धोनीने यष्टीमागे सहा गड्यांना बाद केले. याशिवाय धोनीने झेलांचे अर्धशतकही पूर्ण केले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात अशी कामगिरी करणारा धोनी क्रिकेटविश्वातील एकमेव यष्टीरक्षक ठरला आहे. धोनीने 93 सामन्यांत 54 झेल घेतले आहेत. त्याने दीपक चाहरच्या गोलंदाजीवर जेसन रॉयचा झेल घेत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर हेल्स, इयॉन मोर्गन, बेयरस्टॉ आणि लियाम प्लंकेट यांना झेलबाद केले. सर्व प्रकारच्या टी-20 क्रिकटमध्ये यष्टीमागे 150 झेल घेणारा धोनी जगातील पहिला यष्टीरक्षक झाला आहे.