Join us

India vs England: विराटला बोल्ड करणाऱ्या फिरकीपटूला इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली बोल्ड झाला आणि त्या चेंडूची चर्चा क्रिकेट विश्वात चांगलीच रंगली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 17:46 IST

Open in App
ठळक मुद्देकोहलीवर दडपण वाढवण्यासाठी इंग्लंडच्या संघात रशिदला स्थान देण्यात आले आहे.

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टला सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते भारताचा कर्णधार विराट कोहलीवर. इंग्लंडच्या संघाच्या रडारवर सर्वप्रथम कोहलीच आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत कोहलीला बोल्ड करणाऱ्या फिरकीपटूला इंग्लंडने कसोटी संघात स्थान दिले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली बोल्ड झाला आणि आदिल रशिच्या या चेंडूची चर्चा क्रिकेट विश्वात चांगलीच रंगली. त्यामुळेच कोहलीवर दडपण वाढवण्यासाठी इंग्लंडच्या संघात रशिदला स्थान देण्यात आले आहे.

 

 

इंग्लंडने संघ निवडताना चांगलीत शक्कल लढवली आहे. इंग्लंडने फक्त एकाच सामन्यासाठी हा संघ निवडण्यात आला आहे. दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर होणार आहे. लॉर्ड्सवर फिरकीला पोषक वातावरण नसल्यामुळे त्याला कदाचित दुसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान दिले जाणार नाही. पण पहिल्या सामन्यात मात्र त्याला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड