Join us

India vs England: थंडी में भी गर्मी का ऐहसास... इंग्लंडमध्ये भारतीय संघासाठी खास एअर कंडिशन 

सध्याच्या घडीला भारतीय संघ इसेक्सविरुद्ध सराव सामना खेळत आहे. यावेळी भारतीय संघाला ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवलं आहे, तिथे उष्ण वातावरण आहे, असं संघ व्यवस्थापनाने इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला कळवलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 16:21 IST

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडचा उन्हाळा आणि भारतातील हिवाळा जवळपास सारखा असतो, असं म्हटलं जातं.

लंडन : इंग्लंडचा उन्हाळा आणि भारतातील हिवाळा जवळपास सारखा असतो, असं म्हटलं जातं. सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये उन्हाळा असला तरी तापमान काही जास्त नाही. पण भारतीय संघाला या वातावरणात अधिक उष्ण वाटू लागली आहे. त्यामुळे भारतीय संघ वास्तव्याला असलेल्या हॉटेलमध्ये अतिरीक्त एअर कंडिशन लावण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्याच्या घडीला भारतीय संघ इसेक्सविरुद्ध सराव सामना खेळत आहे. यावेळी भारतीय संघाला ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवलं आहे, तिथे उष्ण वातावरण आहे, असं संघ व्यवस्थापनाने इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला कळवलं. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनेच्या सुचनेनंतर हॉटेलमध्ये अतिरीक्त एअर कंडिशन बसवण्यात आले आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट