Join us

India vs England 2nd Test: कोहलीला जेव्हा अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करतो तेव्हा 

India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कोहली कसून सराव करत आहे. या कोहलीला सरावादरम्यान गोलंदाजी करताना सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला पाहिले गेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 16:33 IST

Open in App
ठळक मुद्दे बीसीसीआय अर्जुनला पुन्हा एकदा झुकते माप देत असल्याचे पुढे आले आहे.

लंडन : सध्याच्या घडीला भारतीय संघात सर्वात फॉर्मात असलेला फलंदाज ठरला आहे तो विराट कोहली. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कोहली कसून सराव करत आहे. या कोहलीला सरावादरम्यान गोलंदाजी करताना सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला पाहिले गेले आहे. त्यामुळे बीसीसीआय अर्जुनला पुन्हा एकदा झुकते माप देत असल्याचे पुढे आले आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ मर्चंट टेलर शाळेच्या मैदानात सराव करत होता. यावेळी अर्जुनलाही भारतीय संघाबरोबर पाहिले गेले. अर्जुनला यावेळी भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले . त्यानंतर अर्जुनने कोहलीसह भारताचा सलामीवीर मुरली विजय यांना काही चेंडू टाकले. यावेळी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, अष्टपैलू रवींद्र जडेजा हेदेखील सराव करत होते.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडअर्जुन तेंडुलकरअजिंक्य रहाणेविराट कोहली