Join us

India vs England: भारताच्या संघात रवींद्र जडेजाला संधी

भारताने या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी दिली आहे. या सामन्यात भारताचा हनुमा विहारी पदार्पण करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 15:10 IST

Open in App
ठळक मुद्देआतापर्यंत झालेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये जडेजाला एकदाही संधी देता आली नव्हती.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या या निर्णयामुळे कुक आपल्याला पहिल्या डावात फलंदाजी करताना दिसणार आहे. भारताने या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी दिली आहे. या सामन्यात भारताचा हनुमा विहारी पदार्पण करत आहे.

 

भरताचा फिरकीपटू आर. अश्विन जायबंदी असल्याने जडेजाला या सामन्यात संधी देण्यात आली आहे. या कसोटी मालिकेतील जडेजाचा हा पहिला सामना असेल. कारण आतापर्यंत झालेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये जडेजाला एकदाही संधी देता आली नव्हती.

 

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजा