Join us

India Vs England One Day : मैदानात प्रपोज करत त्याने जिंकली आयुष्याची मॅच !

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुस-या वन डे सामन्यात विराट कोहली मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला होता, तर इंग्लंडचा संघ आव्हान कायम राखण्याच्या दडपणाखाली होता. या तणावजन्य परिस्थितीत प्रेक्षकांमध्ये रंगलेल्या एका रोमँटीक क्षणाने सर्वांचे लक्ष वेधले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 19:26 IST

Open in App

लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुस-या वन डे सामन्यात विराट कोहली मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला होता, तर इंग्लंडचा संघ आव्हान कायम राखण्याच्या दडपणाखाली होता. या तणावजन्य परिस्थितीत प्रेक्षकांमध्ये रंगलेल्या एका रोमँटीक क्षणाने सर्वांचे लक्ष वेधले. या रोमँटीक सामन्याच्या निकालाची उत्सुकता थर्ड अंपायरलाही लागली होती. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागिदारी करून इंग्लंडला चांगली सुरूवात करून दिली. मात्र, कुलदीप यादवे तीन विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. सामन्यात नाट्यमय वळण आले असताना प्रेक्षकांमध्येही प्रेमाचा सामना रंगला होता आणि कॅमेरामनने तो क्षण अचूक टिपला. संपूर्ण मैदानावर त्या क्षणाची चर्चा रंगली होती. एक युवक अचानक उठला आणि शेजारीच बसलेल्या प्रेयसीला त्याने गुडघ्यावर बसून प्रपोज केले. त्याने खिशातून अंगठी काढल्यानंतर ती युवती भावूक झाली. क्षणाचाही विलंब न लावता तिने त्याला होकार देत मिठी मारली. हा सर्व प्रसंग कॅमेरामनने टिपला आणि मैदानावर उपस्थित असलेल्या युझवेंद्र चहलने त्या प्रेमीयुगूलांचे टाळी वाजवून कौतुक केले. पाहा हा व्हिडिओ.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा