Join us

इंग्लंडविरुद्ध भारताचे पारडे वरचढ, आजपासून एकदिवसीय मालिका

टी-२० मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 05:35 IST

Open in App

नॉटिंघम - टी-२० मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ही मालिका म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकप स्पर्धेची रंगीत तालिम असल्याचे मानल्या जात आहे.पुढील विश्वकप स्पर्धा ब्रिटनमध्ये २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे ही मालिका ‘विराट अ‍ॅन्ड कंपनी’साठी येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची चांगली संधी आहे. पुढील वर्षी याच कालावधीत येथे विश्वकप स्पर्धा होणार आहे.भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली. एकदिवसीय मालिकेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाने यापूर्वीच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाचा ६-० ने धुव्वा उडवला. त्यामुळे इंग्लंड संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.इंग्लंडची गेल्या काही महिन्यांमधील एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. जोस बटलर, जॅसन रॉय, अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेयरस्टो आणि इयान मॉर्गन फॉर्मात असून बेन स्टोक्सच्या उपस्थितीत संघ मजबूत भासत आहे.भारतीय संघव्यवस्थापनाला विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विविध संयोजनाचा पर्याय तपासण्याची संधी मिळाली आहे. के.एल. राहुल चांगल्या फॉर्मात असल्यामुळे कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो. शिखर धवन व रोहित शर्मा डावाची सुरुवात करतील. राहुल तिसºया क्रमांकावर खेळेल. फलंदाजी क्रम हाच कायम राहिल्यास कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल.गोलंदाजीत कुलदीप यादवने टी-२० मध्ये छाप पाडली आहे. अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून सिद्धार्थ कौल किंवा शार्दूल ठाकूर यांना संधी मिळू शकते. भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरला असेल तर तो उमेश यादवसह नव्या चेंडूची जबाबदारी सांभाळेल.महेंद्रसिंग धोनीला या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ३३ धावांची गरज आहे. अशी कामगिरी करणारा तो जागातील १२ वा फलंदाज ठरेल. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघभारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल राहुल, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार.इंग्लंड :- ईयोन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टा, जोस बटलर, मोईन अली, जो रूट, जॅक बाल, टॉम कुरेन, अ‍ॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल रशीद, डेविड विली, मार्क वुड.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीक्रिकेट