Join us  

India vs England 1st T20 LIVE : राहुलचा शतकी इंगा, भारत विजयी

जोस बटलरच्या दमदार फटकेबाजीवर कुलदीप यादवने टिच्चून मारा करून पाणी फेरले. भारताविरूद्धच्या पहिल्या टी-20 लढतीत इंग्लंडने 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 160 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 9:46 PM

Open in App

मँचेस्टर -  जोस बटलरच्या दमदार फटकेबाजीवर कुलदीप यादवने टिच्चून मारा करून पाणी फेरले. भारताविरूद्धच्या पहिल्या टी-20 लढतीत इंग्लंडने 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या.  प्रत्युत्तरात भारताने 160 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात पार केले.  लोकेश राहुलने टी-20 मधले दुसरे शतक करताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. राहुलने 54 चेंडूंत नाबाद 101 धावा केल्या. 

 

- राहुलचे 53 चेंडूंत शतक, विराटचा विजयी षटकार

- विराट कोहलीने टी-20 मध्ये दोन हजार धावांचा पल्ला ओलांडला

सचिन, सेहवाग यांच्याकडून राहुलचे कौतुक

- पंधरा षटकांत 2 बाद 137 धावा, भारताला विजयासाठी 30 चेंडूंत 23 धावांची गरज

- रोहित शर्मा ( 30) आदिल रशिदच्या गोलंदाजीवर बाद

- लोकेश राहुलचे अर्धशतक (27 चेंडूंत 53 धावा)

 

- भारताच्या पाच षटकांत 1 बाद 48 धावा

- शिखर धवनचा त्रिफळा

 

कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडची नांगी

जोस बटलरच्या दमदार फटकेबाजीवर कुलदीप यादवने टिच्चून मारा करून पाणी फेरले. भारताविरूद्धच्या पहिल्या टी-20 लढतीत इंग्लंडने 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या. कुलदीपने एकाच षटकात तीन महत्वाचे फलंदाज बाद केल्याने मोठ्या धावसंख्येकडे कूच करणा-या इंग्लंडला 159 धावांपर्यंत मजल मारता आली. कुलदीपने (5/24) यजमानांचा निम्मा संघ तंबूत पाठवला. उमेश यादवने दोन विकेट घेतल्या. 

- उमेश यादवला दुसरे यश, जॉर्डन आऊट

- बटलरचा अडथळा दूर, कुलदीपचा प्रभाव कायम

- मोइन अली हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी 

- कुलदीपची चौथी विकेट, रूट बाद

- कर्णधार मॉर्गन व बेअरस्टोव्ह बाद, कुलदीपचे तीन बळी

-हेल्सची दांडी गुल, कुलदीप यादवला यश

-बटलरचे अर्धशतक, 29 चेंडूंत 52 धावा

-रॉयनंतर बटलरची फटकेबाजी, इंग्लंडच्या 10 षटकांत 1 बाद  77 धावा

 - इंग्लंडची आक्रमक सुरुवात, पाच षटकांत 1 बाद 50 धावा 

- उमेश यादवने मिळवून दिले पहिले यश, जेसन रॉय बाद

 

- युझवेंद्र चहलच्या पहिल्याच षटकात 16 धावा 

- इंग्लंडला सामन्याआधीच धक्का; दुखापतीमुळे टॉम कुरानची मालिकेतून माघार

 

भारताची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी

मँचेस्टर -  इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

भारतीय संघ पुढील दोन महिने इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामने खेळणार आहे. पहिल्या सामन्यासाठी लोकेश राहुलला संधी देण्यात आली आहे. 

असे आहेत दोन्ही संघ

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतइंग्लंडक्रिकेटक्रीडा