Join us

India vs England : कोहली आणि लारा यांची अशी ही बरोबरी

सध्याच्या घडीला भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत कोहलीने सर्वाधिक 593 धावा केल्या आहेत. या मालिकेत भारताच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला एवढ्या धावा करणे जमलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 17:51 IST

Open in App
ठळक मुद्देलाराने जो विक्रम 17 वर्षांपूर्वी केला होता, त्याच्या कोहली जवळपास आला आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाड ब्रायन लारा आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांची तुलना होऊ शकत नाही. कारण हे दोघेही भिन्न काळात क्रिकेटच्या रणांगणात उतरले आहेत. पण लाराने जो विक्रम 17 वर्षांपूर्वी केला होता, त्याच्या कोहली जवळपास आला आहे.

सध्याच्या घडीला भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत कोहलीने सर्वाधिक 593 धावा केल्या आहेत. या मालिकेत भारताच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला एवढ्या धावा करणे जमलेले नाही. इंग्लंडचा विचार केला तर त्यांच्याकडून सर्वाधिक धावा जोस बटलरने (349) केल्या आहेत. त्यामुळे कोहली आणि बटलर यांच्यामध्ये 244 धावांचे अंतर आहे.

वेस्ट इंडिजचा संघ जवळपास 17 वर्षांपूर्वी श्रीलंकेबरोबर कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत लाराने 688 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून यावेळी सर्वाधिक धावा तिलकरत्ने दिलशानने (403) केल्या होत्या. यावेळी लारा आणि दिलशान यांच्यामध्ये 285 धावांचे अंतर होते. असा हा योगायोग आता 17 वर्षांनंतर पाहायला मिळत आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड