Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs England: भारतीय संघाचे वाजत गाजत स्वागत...

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी एसेक्स क्लबविरूद्धच्या सराव सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंना जल्लोषात स्वागत करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 16:04 IST

Open in App

चेल्मसफोर्ड - इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी एसेक्स क्लबविरूद्धच्या सराव सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंना जल्लोषात स्वागत करण्यात आले. सराव सामन्याच्या दुस-या दिवशी भारतीय फलंदाज मैदानावर आले त्यावेळी तेथील भारतीय नागरिकांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले. भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी खास प्रेक्षकांनी पंजांबी नृत्य केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 6 बाद 322 धावा केल्या. भारताचे सलामीचे तीन फलंदाज अवघ्या 44 धावांवर माघारी परतले होते. मात्र, मुरली विजय ( 53), कर्णधार विराट कोहली ( 68), लोकेश राहुल ( 58) आणि दिनेश कार्तिक ( 82) यांनी भारताचा डाव सावरला. गुरूवारी कार्तिक शतक झळकावेल असे वाटत होते, परंतु तो 82 धावांवरच माघारी फिरली.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा