Join us

india vs england : भारतीय संघाचा सरावाचा श्रीगणेशा

एकदिवसीय मालिकेनंतर काही काळ खेळाडूंना कुटुंबासमवेत फिरण्यासाठी दिला होता. पण आता भारतीय संघाने इसेक्स येथे सरावाला सुरुवात केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 15:46 IST

Open in App
ठळक मुद्देआर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी फिरकी गोलंदाजीचा सराव केला.

लंडन : आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाने आजपासून सरावाला सुरुवात केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला समना 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

भारताने ट्वेन्टी-20 मालिका जिंकली असली तरी त्यानंतर त्यांनी एकदिवसीय मालिका गमवावी लागली होती. एकदिवसीय मालिकेनंतर काही काळ खेळाडूंना कुटुंबासमवेत फिरण्यासाठी दिला होता. पण आता भारतीय संघाने इसेक्स येथे सरावाला सुरुवात केला आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल यांनी यावेळी फलंदजीचा सराव केला. त्याचबरोबर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी फिरकी गोलंदाजीचा सराव केला.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट