Join us

india vs england : भारतीय क्रिकेटपटू लागले कसोटी मालिकेच्या तयारीला

एकदिवसीय मालिकेत भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर गेले काही दिवस भारतीय संघातील खेळाडूंनी आपल्या कुटुंबियांसमवेत काही काळ व्यतित केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 17:34 IST

Open in App
ठळक मुद्देया व्यायामाचा व्हिडीओ भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

लंडन : एकदिवसीय मालिकेत भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर गेले काही दिवस भारतीय संघातील खेळाडूंनी आपल्या कुटुंबियांसमवेत काही काळ व्यतित केला. पण आता भारतीय संघातील खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीला लागले आहेत. रविवारपासून भारतीय संघातील काही खेळाडूंनी व्यायामाला सुरुवात केली आहे. या व्यायामाचा व्हिडीओ भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. आता पहिल्या सामन्याला जवळपास एक आठवडा शिल्लक असल्यामुळे खेळाडूंनी व्यायाम करायला सुरुवात केली आहे.

उमेश आणि सलामीवीर शिखर धवन यांनी आज काही जिममध्ये काही काळ व्यतित केला. यावेळी या दोघांनी व्यायामावर भर दिला. व्यायाम करतानाचा व्हिडीओ उमेशने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये उमेश आणि शिखर हे दोघेही पायांचा व्यायाम करत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशिखर धवनक्रिकेट