Join us

India Vs England : भारतासाठी खुशखबर, इंग्लंडचा हा फलंदाज तिस-या सामन्याला मुकणार

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज खेळवण्यात येणार आहे. मालिका विजयासाठी महत्त्वाच्या या लढतीपूर्वी भारतीय संघासाठी आनंदवार्ता आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 16:15 IST

Open in App

नवी दिल्ली - भारत आणि इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज खेळवण्यात येणार आहे. मालिका विजयासाठी महत्त्वाच्या या लढतीपूर्वी भारतीय संघासाठी आनंदवार्ता आली आहे. इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जेसन रॉय या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. दुस-या सामन्यात त्याच्या बोटाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो तिस-या वन डेतून बाहेर होऊ शकतो. दुस-या सामन्यात सुरेश रैना झेल टिपताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. भारताविरूद्धच्या दोन्ही सामन्यात त्याने इंग्लंडला चांगली सुरूवात करून दिलेली आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीचा भारताला फायदा होऊ शकतो. वैद्यकीय अहवालानुसार त्याचे तंदुरूस्त होण्याची शक्यता 30 टक्केच आहे. त्याच्या जागी जेम्स विंसला संधी मिळू शकते.  मात्र, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने फिटनेस चाचणी झाल्यानंतर जेसनबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा