India vs England : भारताविरुद्धच्या अखेरच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

इंग्लंडने या संघात चार अष्टपैलू खेळाडूंना स्थान दिले आहे. या चौघांनाही जर इंग्लंडच्या संघाने खेळवले तर त्यांना भारताला पराभूत करता येऊ शकते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 19:48 IST2018-09-04T19:47:38+5:302018-09-04T19:48:31+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs England: England announces India's final Test | India vs England : भारताविरुद्धच्या अखेरच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

India vs England : भारताविरुद्धच्या अखेरच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

ठळक मुद्देइंग्लंडने या संघात आदिल रशिदला कायम ठेवले आहे, त्याचबरोबर ख्रिस वोक्सलाही संधी देण्यात आली आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपला 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकचा हा अखेरचा सामना आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ कुकला विजयाने निरोप देण्यासाठी प्रयत्नशील असेल.

इंग्लंडने या संघात आदिल रशिदला कायम ठेवले आहे, त्याचबरोबर ख्रिस वोक्सलाही संधी देण्यात आली आहे. इंग्लंडने या संघात चार अष्टपैलू खेळाडूंना स्थान दिले आहे. या चौघांनाही जर इंग्लंडच्या संघाने खेळवले तर त्यांना भारताला पराभूत करता येऊ शकते. 


Web Title: India vs England: England announces India's final Test