Join us

India vs England: का रे दुरावा... भारताचा क्रिकेटपटू पत्नी विरहाने भावनिक

इंग्लंड विरूध्दच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंचे चित्त थाऱ्यावर रहावे म्हणून पहिल्या तीन कसोटी होइपर्यंत पत्नींपासून दूर राहण्याचा फतवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बजावला होता. BCCI च्या या निर्णयाने भारतीय संघातील खेळाडू पत्नी विरहाने भावनिक झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 16:26 IST

Open in App

बर्मिंगहॅम - इंग्लंड विरूध्दच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंचे चित्त थाऱ्यावर रहावे म्हणून पहिल्या तीन कसोटी होइपर्यंत पत्नींपासून दूर राहण्याचा फतवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बजावला होता. मालिकेत भारताला अपयश आले तर त्याचे खापर खेळाडूंच्या कुटुंबीयांवर फोडले जाऊ नये हा त्यामागचा दुसरा हेतू. पण BCCI च्या या निर्णयाने भारतीय संघातील खेळाडू पत्नी विरहाने भावनिक झाला आहे. त्याने त्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. 

भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक २००७ नंतर कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने सराव सामन्यात ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून पहिल्या कसोटीसाठी दावेदारी मजबूत केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र ११ वर्षानंतर कसोटी पुनरागमनाचा क्षण पाहण्यासाठी पत्नी दीपिका पल्लीकल उपलब्ध नसल्यामुळे कार्तिक भावनिक झाला आहे. त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर तशी पोस्ट केली आहे. कार्तिकने एक फोटो पोस्ट केला आहे त्यात त्याच्यासह पत्नी दीपिका आहे. त्याखाली त्याने, "Missing my lady." असे लिहिले आहे. 

टॅग्स :दिनेश कार्तिकभारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयक्रिकेटक्रीडा