India vs England: भारताविरुद्ध कुकचा ' हा ' विक्रम; पॉन्टिंगला टाकले मागे

कुकने आतापर्यंत 160 कसोटी सामन्यांमध्ये 12, 254 धावा केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 08:23 PM2018-09-07T20:23:11+5:302018-09-07T20:30:01+5:30

whatsapp join usJoin us
India vs England: against India cook made record; Putting back Ponting | India vs England: भारताविरुद्ध कुकचा ' हा ' विक्रम; पॉन्टिंगला टाकले मागे

India vs England: भारताविरुद्ध कुकचा ' हा ' विक्रम; पॉन्टिंगला टाकले मागे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देइंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही यावेळी कुकच्याच नावावर आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : आपला अखेरचा सामना करणारा इंग्लंडचा अॅलिस्टर कुक एकामागून एक विक्रम करत असल्याचे समोर आले आहे. भारताविरुद्धच्या पाचव्या सामन्यात ओव्हल मैदानात हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम कुकने केला आहे. त्याचबरोबर सामन्यासाठी मैदानात उतरताना कुकने अजून एक नवा विक्रम केला आहे.

नवा विक्रम रचताना कुकने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला पिछाडीवर सोडले आहे. कुकने आतापर्यंत 160 कसोटी सामन्यांमध्ये 12, 254 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही यावेळी कुकच्याच नावावर आहे.


भारताविरुद्ध सर्वात जास्त कसोटी सामना खेळण्याचा विक्रम यापूर्वी पॉन्टिंगच्या नावावर होता. भाराताविरुद्ध त्याने 29 सामने खेळले होते. हा विक्रम कुकने मोडीत काढला आहे. कारण कुकचा भारताविरुद्धचा हा तिसावा सामना आहे.

Web Title: India vs England: against India cook made record; Putting back Ponting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.