Join us  

रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले 

Ind vs Eng 5th Test : कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी १८ षटकं खेळून काढताना चांगला खेळ केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 4:41 PM

Open in App

India vs England 5th Test Live update (  Marathi News  ) : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या शतकांनंतर सर्फराज खान व देवदत्त पड्डिकल यांनी वादळी फटकेबाजी केली. या दोघांनी संघाला ४०० पार पोहोचवले. ३ बाद ३७६ वरून भारताचा डाव ८ बाद ४२८ धावा गडगडला होता, परंतु कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी ९व्या विकेटसाठी दुसऱ्या दिवसाची १८ षटकं खेळून काढताना चांगला भारताला अडीचशेपार आघाडी मिळवून दिली. 

शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागल्याने वडील नाराज; म्हणाले, हे योग्य नाही...

इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. भारताच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी ५० हून अधिक धावा चोपताना नवा विक्रम नोंदवला. २००९ ( वि. श्रीलंका) नंतर प्रथमच भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी ५० हून अधिक धावा केल्या. यशस्वी ( ५७) बाद झाल्यानंतर रोहित शर्मा ( १०३)  व शुबमन गिल ( ११०) यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि २४४ चेंडूंत १७१ धावांची भागीदारी केली. लंच ब्रेकनंतर बेन स्टोक्स व जेम्स अँडरसन यांनी दोघांना बाद केल्यानं भारत बॅकफूटवर जाईल असा अंदाज होता. 

पण, सर्फराज खान व पदार्पणवीर देवदत्त पड्डिकल यांनी आक्रमक फटकेबाजी केली आणि १३२ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. टी ब्रेकनंतर शोएब बशीरने भारताचे दोन्ही सेट फलंदाज माघारी पाठवले. सर्फराज ६० चेंडूंत ८ चौकार व  १ षटकारासह ५६ धावांवर झेलबाद झाला, तर देवदत्त १०३ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ६५ धावांवर त्रिफळाचीत झाला. ध्रुव जुरेल ( १५) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बशीरला विकेट देऊन बसला. टॉम हार्टलीने इंग्लंडला ७वे यश मिळवून देताना रवींद्र जडेजाला ( १५) पायचीत केले. त्याच षटकात आर अश्विनचा ( ०) त्रिफळा उडाला. कुलदीप ( २७ ) व जसप्रीत ( १९) यांनी दिवसअखेर चांगली झुंज दिली. भारताने ८ बाद ४७३ धावा केल्या असून २५५ धावांची आघाडी घेतली आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मायशस्वी जैस्वालसर्फराज खानदेवदत्त पडिक्कल