Video : सर्फराज, कुलदीप यांचे अफलातून झेल; R Ashwin च्या फिरकीसमोर इंग्रज फेल, ३ धक्के

शोएब बशीरने डावातील ५ विकेट्स पूर्ण करताना भारताचा पहिला डाव ४७७ धावांवर गुंडाळला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 10:46 AM2024-03-09T10:46:59+5:302024-03-09T10:47:34+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 5th Test Live update Day 3 :  Ravi Ashwin gets 3 wickets, Ben Duckett, ollie pope and Zak Crawley out, England 36-3 (6) , trail by 223 runs, Video  | Video : सर्फराज, कुलदीप यांचे अफलातून झेल; R Ashwin च्या फिरकीसमोर इंग्रज फेल, ३ धक्के

Video : सर्फराज, कुलदीप यांचे अफलातून झेल; R Ashwin च्या फिरकीसमोर इंग्रज फेल, ३ धक्के

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 5th Test Live update (  Marathi News  ) :  इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. १००वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने त्यानंतर फिरकीत कमाल केली. त्याने इंग्लंडचे ३ फलंदाज ३६ धावांवर माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचा विक्रम मोडला. 

मोठी बातमी! रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नाही आला, जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व 


रोहित शर्मा ( १०३) , शुबमन गिल ( ११०) यांच्या वैयक्तिक शतकं आणि यशस्वी जैस्वाल ( ५७), सर्फराज खान ( ५६) व देवदत्त पड्डिकल ( ६५) यांच्या अर्धशतकाने इंग्लंडला झोडले. कुलदीप यादव ( ३०) व जसप्रीत बुमराह ( २०) यांनी नवव्या विकेटसाठी ४९ धावा जोडून इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. तिसऱ्या दिवशी जेम्स अँडरसनने भारताला ९वा धक्का देताना कुलदीपला झेलबाद केले. अँडरसनची ही ७०० वी विकेट ठरली. शोएब बशीरने डावातील ५ विकेट्स पूर्ण करताना भारताचा पहिला डाव ४७७ धावांवर गुंडाळला.  


दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाठीत उसण भरल्याने मैदानावर आला नाही. उप कर्णधार जसप्रीत बुमराह नेतृत्व करतोय. आर अश्विनने इंग्लंडला दुसऱ्या डावात २ धावांवर पहिला धक्का दिला. बेन डकेट पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. अश्विनला सुरुवातीलाच गोलंदाजीला आणण्याचा डाव यशस्वी ठरला आणि त्याने इंग्लंडचा दुसरा सलामीवीर झॅक क्रॉली ( ०) यालाही बाद केले. सर्फराज खानने लेग स्लीपला चांगला झेल टिपला. सध्या सक्रिय असलेल्या गोलंदाजांमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक १११ विकेट्सचा विक्रम अश्विनने नावावर करताना नॅथन लायनला ( ११०) मागे टाकले. ओली पोप ( १७) स्वीप मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. कुलदीप यादवने सुरेख झेल घेतला. 

Web Title: India vs England 5th Test Live update Day 3 :  Ravi Ashwin gets 3 wickets, Ben Duckett, ollie pope and Zak Crawley out, England 36-3 (6) , trail by 223 runs, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.