Join us  

फासे पलटले! रोहित शर्मा, शुबमन गिल यांचे त्रिफळे उडाले; बेन स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर धक्का

लंच ब्रेकनंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 12:41 PM

Open in App

India vs England 5th Test Live update (  Marathi News  ) : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर आघाडी घेतली आहे. रोहित व शुबमन यांनी पाठोपाठ शतक झळकावून विक्रम नावावर केले. पण, लंच ब्रेकनंतर फासे पलटले 

 रोहित शर्मा 'हिट'! ख्रिस गेलचा विक्रम मोडला; राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्याशी बरोबरी

कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले आणि इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळला. कुलदीप यादवने पाच ( ५-७२) विकेट्स घेतल्या. आर अश्विन ( ४-५१) व रवींद्र जडेजाने ( १ विकेट) चांगला मारा केला. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांनी १०४ धावांची भागीदारी करून संघाचा पाया मजबूत केला. यशस्वी ५७ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी दमदार फटकेबाजी केली. या दोघांनी शतक झळकावताना भारताला मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल करून दिली.  रोहितने १५४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारासह शतक झळकावले. रोहितपाठोपाठ शुबमननेही १३७ चेंडूंत शतक पूर्ण केले. 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील रोहितचे हे नववे, तर एकूण १२ वे शतक ठरले. शुबमन यानेही कसोटीतील चौथे शतक झळकावले. लंच ब्रेकनंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला. रोहित १६२ चेंडूंत १०३ धावांवर बाद झाला. एकाच कसोटी मालिकेत भारताच्या कर्णधार व ओपनरने एकापेक्षा अधिक शतकं झळकावण्याची ही चौथी वेळ ठरली.  सुनील गावस्करांनी १९७८-७९ मध्ये विंडीजविरुद्ध ४ शतकं झळकावली होती. त्यानंतर १९७९ मध्ये गावस्करांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन आणि २००६ मध्ये राहुल द्रविडने पाकिस्तानविरुद्ध दोन शतकं झळकावली होती. रोहितच्या विकेटनंतर जेम्स अँडरसनने भारताला मोठा धक्का दिला. त्याने शुबमनचा त्रिफळा उडवला. शुबमन १५० चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह ११० धावांवर बाद झाला.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माशुभमन गिलबेन स्टोक्सजेम्स अँडरसन