Join us

India vs England 4th Test: विक्रमानंतर विराट कोहलीला मिळालेले सरप्राईज पाहिलेत का?

India vs England 4th Test: भारताचा कर्णधार विराट कोहलीने  इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात  माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला एका विक्रमात मागे टाकले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 09:03 IST

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा 119 डावांमध्ये पूर्ण केला. सचिन तेंडुलकरला कसोटीत हा पल्ला गाठण्यासाठी 120 डाव लागले होते.

साऊदम्टन, भारत विरुद्ध इंग्लंड: भारताचा कर्णधार विराट कोहलीने  इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात  माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला एका विक्रमात मागे टाकले. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना साऊथम्पटन येथे सुरु आहे. या सामन्यात कोहलीने 21व्या षटकात चौकार लगावला आणि कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा पल्ला गाठला.  कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा 119 डावांमध्ये पूर्ण केला. पण सचिनला कसोटीत हा पल्ला गाठण्यासाठी 120 डाव लागले होते. त्यामुळे फक्त एका डावाने कोहली सचिनपेक्षा सरस ठरला आहे. भारताकडून सर्वात जलद सहा हजार धावा करण्याचा विक्रम माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. गावस्कर यांनी 117 डावांमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या. पण सर डॉन ब्रॅडमन यांनी फक्त 68 डावांमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

विराटने 71 चेंडूंत 6 चौकारांसह 46 धावा केल्या. त्याने शतकवीर चेतेश्वर पुजारासह तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. भारताचा पहिला डाव 273 धावांत संपुष्टात आला. भारतीय खेळाडू दिवसाचा खेळ संपल्यानंतर हॉटेलमध्ये परतल्यानंतर विराटला एक सरप्राईज मिळाले. ते पाहून विराटही अत्यंत भारावला. हॉटेल स्टाफने विराटला कोणते सरप्राईज दिले ते पाहा...  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीसचिन तेंडुलकरबीसीसीआयक्रिकेट