Join us

India vs England 4th Test: मैदानात उतरण्यापूर्वी शिखर धवनने केला कसून सराव

धवनने तिसऱ्या सामन्यात संघात पुनरागमन केले होते. पण या सामन्यात त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला संघात स्थान देणार का, अशी चर्चा सुरु होती. पण विजयानंतर संघत बदल करायचा नाही, हे ठरवण्यात आले आणि धवनला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:27 IST

Open in App
ठळक मुद्दे बीसीसीआयने धवन सराव करत असल्याचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस चांगलाच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव संपवला. आता दुसऱ्या दिवशी भारताचे सलामीवीर कशी कामगिरी करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवनने मैदानात उतरण्यापूर्वी कसून सराव केला. बीसीसीआयने धवन सराव करत असल्याचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

धवनला आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे धवनला दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते. पण एकही सलामीवीर चांगली फलंदाजी करत नसल्याने धवनला तिसऱ्या कसोटीसाठी पुन्हा एकदा संघात स्थान दिले. तिसरा सामना जिंकल्यामुळे चौथ्या सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीने संघात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे त्याला या सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे.

धवनने तिसऱ्या सामन्यात संघात पुनरागमन केले होते. पण या सामन्यात त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला संघात स्थान देणार का, अशी चर्चा सुरु होती. पण विजयानंतर संघत बदल करायचा नाही, हे ठरवण्यात आले आणि धवनला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. त्यामुळे या सामन्यात दमदार कामगिरी करण्यासाठी धवनने कसून सराव केला आहे.

टॅग्स :शिखर धवनभारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट