India vs England 4th Test Live Update Marathi News : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) पुन्हा उल्लेखनीय खेळी करताना भारताच्या डावाला आकार दिला होता. पण, इंग्लंडच्या फिरकीपटूंनी बाजी पटलवली. शोएब बशीरने ४ धक्के दिले आणि टॉम हार्टलीने २ विकेट्स घेतल्या. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय सघ बॅकफूटवर गेलेला पाहायला मिळतोय. भारताच्या तीन विकेट्स या अम्पायर कॉलमुळे इंग्लंडला मिळाल्या.
यशस्वी जैस्वालचा भीमपराक्रम! १९७८नंतर असा विक्रम प्रथमच झाला, ब्रॅडमन यांच्या पंक्तित स्थान
आकाश दीपने ३ धक्के दिल्यानंतरही इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगले पुनरागमन केले. अनुभवी फलंदाज जो रूट ( Joe Root ) मैदानावर उभा राहिला आणि त्याने ५ बाद ११२ धावांवरून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. जॉनी बेअरस्टो ( ३८) , बेन फोक्स ( ४७) व ऑली रॉबिन्सन ( ५८) यांना सोबत घेऊन रूटने भारताला टक्कर दिली. इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर आटोपला. जो रूट २७४ चेंडूत १० चौकारांसह १२२ धावांवर नाबाद राहिला. जडेजाने ३, आकाश दीपने ३ आणि मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या.