Join us

India vs England 4th test Live : आर अश्विनला पुन्हा बाकावर बसवल्यानं संतापली पत्नी; ट्विट करून विराट कोहलीवर साधला निशाणा?

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : याही सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं अष्टपैलू खेळाडू आर अश्विन ( R Ashwin) ) याला न खेळवल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 18:50 IST

Open in App

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : चौथ्या कसोटीत टीम इंडियाची अवस्था पुन्हा एकदा खडतर झाली आहे. भारताचे चार फलंदाज ६९ धावांवर माघारी परतला असून कसोटी मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या ख्रिस वोक्सनं तीन धक्के दिले आहेत. दरम्यान, याही सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं अष्टपैलू खेळाडू आर अश्विन ( R Ashwin) ) याला न खेळवल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याच्यासह कोहलीचा हा निर्णय चुकला अशी प्रतिक्रिया दिली. सलग चार सामने अश्विनला बाकावर बसवल्यानंतर त्याच्या पत्नीनंही नाराजी व्यक्त केली. तिनं केलेलं ट्विट सध्या व्हायरल झाले आहे.

जगात भारी, विराट कोहली!; कॅप्टन कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम!

लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी संयमी सुरुवात केली, परंतु आजच्या सामन्यातून इंग्लंडच्या ताफ्यात कमबॅक करणाऱ्या ख्रिस वोक्सनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. लोकेश राहुल ( KL Rahul) याचीही विकेट पडली. ऑली रॉबिन्सननं त्याला पायचीत केले.  रोहित ११ व लोकेश १७ धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ११ धावांची भागीदारी जेम्स अँडरसननं तोडली. पुजारा ४ धावांवर माघारी परतला. अजिंक्य रहाणेच्या जागी बढती मिळालेल्या रवींद्र जडेजालाही खास कमाल करता आली नाही. तो १० धावांवर माघारी परतला. 

त्याचवेळी अश्विनची पत्नी प्रिती हिनं एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये तिची मुलगी दुर्बिणीतून काहीतरी शोधत आहे आणि त्यावर प्रितीनं कमेंट लिहिली की आर अश्विनला शोधतेय...

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विन
Open in App