Concussion Substitute : कळीचा मुद्दा! दुबेच्या जागी राणा कसा? बटलरनंही व्यक्त केली नाराजी

आकाश चोप्रानेही उपस्थितीत केला प्रश्न, परफेक्ट पर्याय कोण होतं तेही सांगितलंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 02:02 IST2025-02-01T01:58:52+5:302025-02-01T02:02:39+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th T20I Jos Buttler Openly Questions Team India's Decision To Bring Harshit Rana As Concussion Substitute Shivam Dube England Captain Says It is not a like for like replacement | Concussion Substitute : कळीचा मुद्दा! दुबेच्या जागी राणा कसा? बटलरनंही व्यक्त केली नाराजी

Concussion Substitute : कळीचा मुद्दा! दुबेच्या जागी राणा कसा? बटलरनंही व्यक्त केली नाराजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jos Buttler Not Happy Harshit Rana As Concussion Substitute Shivam Dube : इंग्लंडच्या संघाला 'करो वा मरो' अशा लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. पुण्याच्या मैदानातील चौथ्या टी-२० सामन्यातील पराभवासह इंग्लंडच्या संघाने पाच सामन्यांची मालिका गमावली आहे. या सामन्यात शिवम दुबेच्या बदली खेळाडूच्या रुपात (Concussion Substitute) हर्षित राणाला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली त्याने या संधीचा फायदाही उठवला. पण टीम इंडियाचा हा निर्णय आता कळीचा मुद्दा ठरताना दिसतो. मॅचनंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने ते उघडपणे बोलूनही दाखवलं आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'त्या' कळीच्या मुद्यावर काय म्हणाला बटलर?

सामन्यानंतर जोस बटलर हताश दिसला. पोस्ट मॅच प्रेजेंटेशनमध्ये तो म्हणाला की, या सामन्यात आम्ही चांगली सुरुवात केली. गोलंदाजीसह फलंदाजी वेळीही आम्ही चांगली सुरुवात दिली. पण निकाल निराशजनक लागला. संघाने विजयसाठी जे प्रयत्न केले त्याने समाधानी आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्याने कळीचा मुद्दा ठरत असलेल्या कन्कशन सबस्टिट्यूटच्या मुद्यावर (खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे बदली खेळाडूसंदर्भातील नियम) भाष्य करताना भारतीय संघाच्या निर्णयावर नाराजीही व्यक्त केली. तो म्हणाला की, शिवम दुबेच्या जागी समतुल्य बदली खेळाडू मैदानात उतरला नव्हता. शिवम दुबे हा बॅटिंग ऑलराउंडर असून गोलंदाजी वेळी त्याचं स्पीड किती असते हे सांगत बटलरनं हर्षित राणा त्याची लाइफ फॉर लाइफ रिप्लेसमेंट होऊ शकत नाही, असे बोलून दाखवले.

आकाश चोप्रानेही उपस्थितीत केला प्रश्न, परफेक्ट पर्याय कोण होतं तेही सांगितलंय

जोस बटलरच नाही तर भारताचा माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्रानंही मॅच दरम्यान हर्षित राणा हा शिवम दुबेची रिप्लेसमेंट कसा होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थितीत केल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर कन्कशन सबस्टिट्यूट रुपात शिवम दुबेच्या जागी रमणदीप सिंग हा टीम इंडियाकडे परेफेक्ट रिप्लेसमेंट होता, असेही आकाश चोप्रानं म्हटंल आहे.  

काय आहे Concussion Substitute नियम? 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामना सुरु असताना खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 'कन्कशन सबस्टिट्यूट'चा नियम लागू करण्यात आला आहे. २०१९ पासून हा नियम सक्रिय आहे. खेळाडूच्या डोक्याव मार बसला की, वैद्यकीय पथक मैदानात येऊन खेळाडूची तपासणी करते.  बॅटर/ विकेट किपरनं हेल्मेट घातलं असलं तरी ही प्रकिया केली जाते. या परिस्थितीत बदली खेळाडूही देण्याला परवानगी दिली जाते. पण आय़सीसीच्या नियमानुसार, रिप्लेसमेंट ही लाइक फॉर लाइक असावी, असा नियम आहे. याचा अर्थ बॅटरच्या जागी बॅटर, बॉलरच्या जागी बॉलर तर ऑल राउंडरच्या जागी ऑलराउंडर. आता या नियमानुसार, बॅटरच्या जागी बॉलर किंवा जलदगती गोलंदाजाऐवजी फिरकी गोलंदाज हा पर्याय योग्य ठरू शकत नाही. शिवम दुबे आणि हर्षित राणा यांच्यात असाच सीन पाहायला मिळतो. हर्षित राणा हा जलदगती गोलंदाज आहे. दुसरीकडे शिवम दुबे गोलंदाजी करत असला तरी तो मध्यमगती गोलंदाजी करतो. त्यामुळे हर्षित राणाची निवड कळीचा मुद्दा ठरताना दिसते.   

Web Title: India vs England 4th T20I Jos Buttler Openly Questions Team India's Decision To Bring Harshit Rana As Concussion Substitute Shivam Dube England Captain Says It is not a like for like replacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.