इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत पुण्याचं मैदान मारत टीम इंडियानं टी-२० मालिका खिशात घातली आहे. या सामन्यातील विजयाची खास गोष्ट म्हणजे प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेल्या खेळाडूच्या जोरावर भारतीय संघानं सामना जिंकत मालिका खिशात घातली. यासह भारतीय संघानं २०१९ पासून घरच्या मैदानात सुरु असलेल्या मालिका विजयाचा सिलसिला कायम राखत सलग १७ वी टी-२० मालिका खिशात घातली. शिवम दुबेच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात आलेल्या हर्षित राणानं ३ विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फिरकीनं लावला इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजीला सुरुंग
भारतीय संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघानं यावेळी दमदार सुरुवात केली होती. फिलिप सॉल्ट २३(२१) आणि बेन डकेट ३९ (१९) या जोडीन संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होते. पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात टीम इंडियाच्या बापूनं अर्धात भारतीय टी-२० संघाच्या उप कर्णधारानं ही जोडी फोडली. रवी बिश्नोईनं धोकादायक वाटणाऱअया बेन डकेट याला ३९ धावांवर तंबूत धाडले. भारतीय संघाला पहिलं यश मिळालं त्यावेळी इंग्लंडच्या धावफलकावर ६२ धावा लागल्या होत्या. त्यानंतर उप कर्णधार अक्षर पटेलनं सॉल्टला माघारी धाडले. पुन्हा रवी बिश्नोई आपलं वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आला अन् त्याने भारतीय संघाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. जोस बटलरला त्याने अवघ्या २ धावांवर माघारी धाडले.
...अन् प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या हर्षित राणाला मिळाली कमबॅकची संधी
फिरकीनं आघाडीच्या फळीची फिरकी घेतल्यावर सामना भारताच्या बाजूनं वळला. त्यात भारतीय संघानं कन्कशन सब्स्टिट्यूटच्या रुपात एकदम परफेक्ट डाव खेळला. शिवम दुबेच्या रुपात हर्षित राणानं मैदानात एन्ट्री मारली. त्याने अजब गजब पदार्पणात पहिल्याच ओव्हरमध्ये लायम लिविंगस्टोनला माघारी धाडत इंग्लंडला आणखी बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर हॅरी ब्रूकच्या फटकेबाजीमुळे सामन्यात पुन्हा ट्विस्ट आले.
प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या खेळाडूनं जिंकून दिला सामना
इंग्लंडकडून तुफान फटकेबाजीच्या मूडमध्ये असलेल्या हॅरी ब्रूकला वरुण चक्रवर्तीनं आपल्या चक्रव्यूहात फसवलं. तो २६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५१ धावा करून माघारी फिरला. तो आउट झाल्यावरही सामना कुणाकडेही झुकू शकतो अशी परिस्थिती होती. जेमी ओव्हरटन सामना टर्न करतोय की, काय असं वाटत होते. पण दुसऱ्या षटकात हॅरी ब्रूकचा मार खाणाऱ्या हर्षित राणानं त्याची विकेट घेतली अन् इंग्लंडच्या उरल्या सुरल्या अपेक्षाही संपुष्टात आल्या. भारतीय संघाने इग्लंडला १६६ धावांत ऑल आउट करत सामन्यासह मालिका खिशात घातली. प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या हर्षित राणानं बदली खेळाडूच्या रुपात येऊन ४ षटकात ३३ धावा खर्च करत ३ विकेट्स घेत सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.