India vs England 4th T20I A unique T20I debut for Harshit Rana : पुण्याच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हर्षित राणा याला शिवम दुबेच्या रुपात बदली खेळाडूच्या (कन्कशन सब्स्टीट्यूट) रुपात पदार्पणाची संधी मिळाली. तो गोलंदाजीला आला अन् पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला विकेटही मिळाली. शिवम दुबेच्या जागी तो परेफक्ट रिप्लेयमेंट होता का? हा चर्चेचा एक वेगळा मुद्दा आहे. हटके पदार्पणातील पहिल्याच षटकात लायम लिविंगस्टोनची विकेट घेत एक खास रेकॉर्ड त्याच्या नावे झाला आहे. बदली खेळाडूच्या रुपात पदार्पण करताना पहिल्याच षटकात विकेट घेणारा तो पहिला क्रिकेटर ठरलाय. त्याला विकेट मिळाल्यावर डग आउटमध्ये टीम इंडिचा कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन बघण्याजोगी होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL मध्ये केकेआरकडून खेळतो; गंभीरचा लाडला असल्याचीही रंगते चर्चा
हर्षित राणा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळताना दिसले आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्विकारण्याआधी गंभीर या संघाचा मेंटॉर राहिला आहे. त्यामुळे हर्षित राणा आणि गौतम गंभीर यांच्यात एक कमालीचे बॉन्डिंग आहे. आपल्या मर्जीतील खेळाडूला गंभीरनं कसोटी संघातही फिट केले होते. आता त्याला टी-२० मध्येही पदार्पणाची संधी देण्यात आली. त्याच्यावर खेळलेला डाव पहिल्या षटकात यशस्वीही ठरला.
दुसऱ्या षटकात खाल्ला मार
बदली खेळाडूच्या रुपात पदार्पणाची संधी मिळाल्यावर पहिल्या षटकात ५ धावा खर्च करून त्याने पहिली विकेट घेतली. पण दुसऱ्या षटकात मात्र त्याने धावाही दिल्या. दुसऱ्या षटकात त्याने १८ धावा खर्च केल्या. हॅरी ब्रूकनं त्याच्या या षटकात दोन षटकार आणि एक खणखणीत चौकार मारला.
बदली खेळाडूच्या रुपात पदार्ण करणारे खेळाडू
- ब्रायन मुडझिंगान्यामा कसोटी विरुद्ध श्रीलंका (हरारे) २०२०
- नील रॉक वनडे विरुद्ध वेस्ट इंडिज किंग्स्टन २०२२
- खाया झोंडो कसोटी विरुद्ध बॅन गकेबेर्हा २०२२
- मॅट पार्किन्सन कसोटी विरुद्ध न्यूझीलंड लॉर्ड्स २०२२
- कामरान गुलाम वनडे विरुद्ध न्यूझीलंड कराची २०२३
- बहिर शाह कसोटी विरुद्ध बांगलादेश मीरपूर २०२३
- हर्षित राणा टी २० विरुद्ध इंग्लंड. पुणे २०२५