india vs England 2021 3rd test match live cricket score : लिड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळालं. कोणतीच घाई न करता संयमानं खेळ करत भारतीय संघानी इंग्लंडला उत्तर दिले आहे. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताच्या धावसंख्येत भर घातली. रोहित शर्माला अम्पायरच्या चुकीमुळे माघारी जावं लागलं, परंतु पुजारानं एक बाजू खिंड लढवत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.
Video : लॉर्ड्सवर फिल्डींग अन् लिड्सवर फलंदाजी; टीम इंडियाच्या 'इंग्लिश' फॅननं घातला गोंधळ
दुसऱ्या डावात रोहित व लोकेशनं आश्वासक सुरुवात करत काही सुरेख फटके मारले. लोकेशला अम्पायरनं पायचीत बाद दिले होते, पंरतु त्यानं लगेच रिव्ह्यू घेतला आणि त्यामुळे तो वाचला. पण, त्याचा फायदा उचलण्यात तो अपयशी ठरला. लंच ब्रेक होण्यापूर्वीच्या षटकात लोकेश ८ धावांवर माघारी परतला. रोहित व चेतश्वर पुजारा या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी १७३ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून टीम इंडियाचा डाव सावरला. रोहितनं २०२१मधील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. पण, ४८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहितसाठी LBWची अपील झाली, मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. याविरोधात हिटमॅननं DRS घेतला. त्यात चेंडू यष्टिंना चुकवून जात असल्याचे दिसत होते. फक्त umpires call मुळे रोहितला बाद ठरवण्यात आले. रोहित १५६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५९ धावांवर माघारी परतला. Ind vs Eng 3rd Test live, Eng vs ind 3rd test live score, Eng vs Ind 3rd test live score board
अम्पायरच्या चुकीचा टीम इंडियाला मोठा धक्का, बाद नसूनही रोहित शर्माला जावे लागेल माघारी!
भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गडगल्यानतंर इंग्लंडचे सलामीवीर हसीब हमीद ( ६८) आणि रोरी बर्न्स ( ६१) यांनी १३५ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार जो रूटनं पुन्हा एकदा दमदार खेळ केला. त्यानं डेविड मलानसह ( ७०) १३९ धावांची भागीदारी केली. रूट १६५ चेंडूंत १४ चौकारांसह १२१ धावा करून माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं मोईन अलीची ( २९) विकेट घेतली. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. India vs England 3rd Test Live, India vs England 3rd Test