India vs England 3rd Test Live Updates Day 3( Marathi News ) - रवींद्र जडेजामुळे पदार्पणवीर सर्फराज खानला रन आऊट होऊन माघारी जाताना पाहून रोहित शर्मा प्रचंड संतापला होता. ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या रोहितने रागात कॅप काढून फेकली होती. भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित आणखी एका कारणावरून जडेजाला टोमणे मारताना दिसला. राजकोट कसोटीत लोकल बॉय रवींद्र जडेजाने शतक झळकावले, परंतु गोलंदाजीत त्याला फार कमाल करता आलेली नाही. त्याच्याकडून पुन्हा एकदा नो बॉल पडले आणि त्यावरून रोहितने त्याला टोमणा हाणला...
३०व्या षटकार रोहितने गोलंदाजीला रवींद्र जडेजाला आणले. तेव्हा त्याने त्या षटकात पुन्हा नो बॉल टाकले. त्यावर रोहितने टोमणा मारला. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या जडेजाला रोहितने टोमणा मारला. त्याने म्हटले,''यार, हा जडेजा आयपीएलमध्ये नो बॉल तर टाकत नाही. ट्वेंटी-२० समझून गोलंदाजी कर, जड्डू... ''
तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारतीय गोलंदाजांनी गाजवले. इंग्लंडच्या बेन डकेटने ( Ben Duckett ) १५३ धावांची आक्रमक खेळी करून भारताचे टेंशन वाढवले होते. पण, कुलदीप यादवने त्याला फिरकीच्या जाळ्यात ओढले आणि चतुराईने ही विकेट मिळवली. त्याआधी कुलदीपने जॉनी बेअरस्टोची ( ०) आणि जसप्रीत बुमराहने जो रुटची ( १८) विकेट घेतली. ४४५ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा निम्मा संघ २६० धावांत तंबूत परतला. आर अश्विनला कौटुंबिक कारणामुळे अचानक तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. देवदत्त पडिक्कल बदली खेळाडू म्हणून संघात खेळतोय. बेन डकेटने १५१ चंडूंत २३ चौकार व २ षटकारांसह १५३ धावांची विक्रमी खेळी केली. कुलदीपच्या गोलंदाजीवर डकेत झेलबाद झाला. इग्लंडच्या ५ बाद २९० झाल्या आहेत.