IND vs ENG 3rd Test : इंग्लंडचा जबरदस्त पलटवार, बेन डकेटच्या शतकाच्या जोरावर ७च्या सरासरीने कुटल्या धावा

भारताच्या पहिल्या डावाच्या ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात सलामीवीर बेन डकेटने वेगवान शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 05:07 PM2024-02-16T17:07:53+5:302024-02-16T17:08:43+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test Live update :  Stumps on day 2, Indian 1st innings 445 vs England 203/2,  Ben Duckett ( 133*) The Hero of the Day | IND vs ENG 3rd Test : इंग्लंडचा जबरदस्त पलटवार, बेन डकेटच्या शतकाच्या जोरावर ७च्या सरासरीने कुटल्या धावा

IND vs ENG 3rd Test : इंग्लंडचा जबरदस्त पलटवार, बेन डकेटच्या शतकाच्या जोरावर ७च्या सरासरीने कुटल्या धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd Test Live Updates Day 2 - फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर भारताने जसा धावांचा डोंगर उभा केला, तसेच उत्तर इंग्लंडकडूनही मिळेल, याची अपेक्षा होतीच. भारताच्या पहिल्या डावाच्या ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात सलामीवीर बेन डकेटने वेगवान शतक झळकावले. इंग्लंडच्या फलंदाजांनी बॅझबॉल खेळ कायम राखताना साडेसहाच्या सरासरीने धावा कुटल्या. 


भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत यजमानांनी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. रोहित शर्मा ( १३१ ) व रवींद्र जडेजा ( ११२)  यांच्या शतकी खेळीने भारतीय फलंदाजांना बळ दिले आणि त्यानतंर पदार्पणवीर सर्फराज खानच्या ( ६२) आक्रमक फटकेबाजीने इंग्लंडचे धाबे दणाणून सोडले. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या अर्ध्यातासात भारताला दोन धक्के बसले खरे, परंतु आर अश्विन ( ३७) व पदार्पणवीर ध्रुव जुरेल ( ४६) यांची जोडी जमली. रेहान अहमदने ही आठव्या विकेटसाठीची ७७ ( १७५ ) धावांची भागीदारी तोडली. जसप्रीत बुमराहने २६ धावा जोडल्या आणि भारताचा पहिला डाव ४४५ धावांवर संपुष्टात आला.  


फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर बेन डकेटने खोऱ्याने धावा चोपल्या. झॅक क्रॉली ( १५) संयमी खेळ करून त्याला उत्तम साथ देत होता, परंतु आर अश्विनने त्याला बाद केले. अश्विनची ही कसोटीती ५०० वी विकेट ठरली. अश्विनने २५७१४ चेंडूंत हा टप्पा पार केला आणि सर्वात कमी चेंडूंत ५०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले. ग्लेन मॅकग्राथने २५५२८ चेंडूत आणि जेम्स अँडरसनने २८१५० चेंडूंत हा पराक्रम केला होता. इंग्लंडचा सलामीवीर डकेट खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याने ८८ चेंडूंत शतक पूर्ण करताना २०१२ साली रॉस टेलरने ( ९९ चेंडू) नोंदवलेला विक्रम मोडला. भारतात कसोटीतील हे तिसरे वेगवान शतक ठरले. एडम गिलख्रिस्टने २००१ मध्ये ८४ चेंडूंत, तर क्लाईव्ह लॉईड यांनी १९७४ मध्ये ८५ चेंडूंत शतक झळकावले होते.

 
क्रॉली बाद झाल्यानंतर डकेट व ऑली पोप यांनी भारतीय संघाची झोप उडवताना ९३ धावांची भागीदारी केली. डकेट भारतीय गोलंदाजांना चांगलाच झोडत होता, तर पोपही अधुनमधून हात साफ करून घेत होता. या जोडीला तोडण्यासाठी रोहितने जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजला आणले आणि त्याने विकेट मिळवून दिली. पोप ३९ धावांवर पायचीत झाला. इंग्लंडने ३४ षटकांत २०० धावा उभ्या करून भारताचं टेंशन वाढवलं. इंग्लंडने ३५ षटकांत २ बाद २०७ धावांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपवला. डकेत ११८ चेंडूंत २१ चौकार व २ षटकारांसह १३३ धावांवर नाबाद आहे. 

Web Title: India vs England 3rd Test Live update :  Stumps on day 2, Indian 1st innings 445 vs England 203/2,  Ben Duckett ( 133*) The Hero of the Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.