Join us

India vs England 3rd Test: भारताला तीन धक्के, वोक्सचा भेदक मारा

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत यजमानांच्या भेदक गोलंदाजीचा मारा पुन्हा अनुभवायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 17:47 IST

Open in App

ट्रेंट ब्रिज - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत यजमानांच्या भेदक गोलंदाजीचा मारा पुन्हा अनुभवायला मिळाला. उपहारापर्यंत भारताचे आघाडीचे तीन फलंदाज 82 धावांवर माघारी पाठवण्यात इंग्लंडला यश आले. दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ख्रिस वोक्सने भारताचे तिन्ही फलंदाज बाद केले. तिसऱ्या कसोटीच्या नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूने लागला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांची पुन्हा कसोटी लागणार आहे. मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत प्रयोग करण्याचे सत्र कायम राखले आहे. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी अपेक्षित सुरूवात केली, परंतु जबरदस्त स्विंग होणाऱ्या चेंडूंचा सामना करताना ते विकेट देऊन माघारी परतले. चेतेश्वर पुजाराही फार काही चमक दाखवू शकला नाही. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटशिखर धवनचेतेश्वर पुजाराक्रीडा