Join us

India vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने भारताला सुरुवातीला दोन धक्के दिले. ब्रॉडने रिषभ पंत (24) आणि आर. अश्विन (14) या दोघांनाही त्रिफळाचीत केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 17:36 IST

Open in App
ठळक मुद्देतीन धावांमध्ये भारताने दोन फलंदाज गमावले आणि त्यांचा पहिला डाव 329 धावांवर संपुष्टात आला.

नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा डाव फक्त 22 धावांत गडगडला. पहिल्या दिवशी भारताने 6 बाद 309 अशी मजल मारली होती. पण दुसऱ्या दिवशी भारताच्या तळाच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने भारताला सुरुवातीला दोन धक्के दिले. ब्रॉडने रिषभ पंत (24) आणि आर. अश्विन (14) या दोघांनाही त्रिफळाचीत केले. त्यानंतर तीन धावांमध्ये भारताने दोन फलंदाज गमावले आणि त्यांचा पहिला डाव 329 धावांवर संपुष्टात आला.

इंग्लंडकडून ब्रॉड, जेम्स अँडरसन आणि ख्रस वोक्स यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली (97 ) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (81) यांनी दमदार फलंदाजी केली. त्यामुळे भारताला तिनशे धावांचा पल्ला गाठता आला.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीअजिंक्य रहाणे