Join us  

India vs England 3rd Test: भारताचा विजय एक पाऊल दूर

बटलर, स्टोक्स, रशिदची चिवट फलंदाजी; बुमराहचे ५ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 3:25 AM

Open in App

नॉटिंगहॅम : जोस बटलर (१०६), बेन स्टोक्स (६२), रशिद (खेळत आहे ३०), स्टुअर्ड ब्रॉड (२०) यांच्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी ९ बाद ३११ धावांपर्यंत मजल मारून भारताचा विजय लांबविला. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने ८५ धावात ५ विकेट घेऊन इंग्लंड संघाच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. भारतीय संघाला उद्या (बुधवार) पाचव्या दिवशी इंग्लंडचा एक गडी बाद करण्यासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.तत्पूर्वी, ५२१ धावांच्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज भारतीय वेगवान माºयापुढे अडखळले. इंग्लंडला विजयासाठी २१० धावाची आवश्यकता आहे.यावेळी, कर्णधार जो रुट - आॅली पोप यांच्यावर मोठी जबाबदारी होती. या दोघांनी संयमी खेळ करत इंग्लंडला सावरण्याचा प्रयत्नही केला. मात्र लंचपर्यंत दोघांनाही बाद करण्यात भारताने यश मिळवले आणि पुन्हा एकदा सामन्यावर पकड मिळवली. जसप्रीत बुमराहने भारताला मोलाचा बळी मिळवून देताना कर्णधार जो रुटला बाद केले. त्याने ४० चेंडूत २ चौकारांसह १३ धावा केल्या. मोहम्मद शमीने पोपला बाद करुन इंग्लंडला चौथा धक्का दिला. पोपने ३९ चेंडूत ३ चौकारांसह १६ धावांची खेळी केली. दोघेही फलंदाज अनुक्रमे २५व्या व २६व्या षटकात बाद झाल्याने इंग्लंडची ४ बाद ६२ धावा अशी घसरगुंडी उडाली. परंतु, यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना इंग्लंडची पडझड रोखत भारतीय वेगवान गोलंदाजांनाही डोके वर काढू दिले नाही. या दोघांनी चहापानपर्यंत नाबाद राहत इंग्लंडला सावरले. खेळ थांबला तेव्हा स्टोक्सने १११ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ४२ धावा, तर बटलरने ११५ चेंडूट १३ चौकारांसह नाबाद ६७ धावा काढल्या होत्या. भारताकडून इशांतने चांगला मारा करताना २, तर बुमराह आणि शमी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.संक्षिप्त धावफलक :भारत (पहिला डाव) : सर्वबाद ३२९ धावा. इंग्लंड (पहिला डाव) : सर्वबाद १६१ धावा. भारत (दुसरा डाव) : ११० षटकात ७ बाद ३५२ धावा घोषित.इंग्लंड (दुसरा डाव) : ६२ षटकात ४ बाद १७३ धावा (जोस बटलर ६७ खेळत आहे, बेन स्टोक्स ४२ खेळत आहे; इशांत शर्मा २/४३, मोहम्मद शमी १/३८, जसप्रीत बुमराह ५/८५)

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतइंग्लंड