Varun Chakravarthy Record : वरुण चक्रवर्तीचा 'पंजा'! दुसऱ्यांदा साधला अर्धा संघ तंबूत धाडण्याचा डाव

क्रिकेटच्या छोट्या  प्रारुपात पुन्हा पुन्हा मोठी कामगिरी करुन दाखवण्याची धमक दाखवणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:56 IST2025-01-28T20:51:12+5:302025-01-28T20:56:34+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd T20I Varun Chakravarthy becomes the third Indian bowler to take multiple five-wicket hauls in T20I history | Varun Chakravarthy Record : वरुण चक्रवर्तीचा 'पंजा'! दुसऱ्यांदा साधला अर्धा संघ तंबूत धाडण्याचा डाव

Varun Chakravarthy Record : वरुण चक्रवर्तीचा 'पंजा'! दुसऱ्यांदा साधला अर्धा संघ तंबूत धाडण्याचा डाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG, Varun Chakravarthy Record Multiple Five-Wicket Hauls In T20I History : इंग्लंड विरुद्धच्या राजकोटच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पुन्हा एकदा इंग्लंडचे फलंदाज फिरकीच्या जाळ्यात फसले. एकट्या वरुण चक्रवर्तीनं पाहुण्यांचा अर्धा संघ तंबूत धाडला. या कामगिरीसह वरुण चक्रवर्तीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. क्रिकेटच्या छोट्या  प्रारुपात पुन्हा पुन्हा मोठी कामगिरी करुन दाखवण्याची धमक दाखवणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एकट्या वरुण चक्रवर्तीनं इंग्लंडचा अर्धा संघ धाडला तंबूत 

टीम इंडिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करणाऱ्या इंग्लंडच्या संघातील फलंदाजांनी पुन्हा एकदा वरुण चक्रवर्तीसमोर नांगी टाकली. राजकोटच्या मैदानातील तिसऱ्या टी-२० सामन्यात वरुण चक्रवर्तीने पाच विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. यासह त्याने दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ४ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. फारच कमी गोलंदाज छोट्या फॉर्मेटमध्ये अर्धा संघ तंबूत धाडण्यात यशस्वी ठरतात. यात वरुण चक्रवर्तीचा नंबर लागतो. 

वरुण चक्रवर्तीनं दुसऱ्यांदा साधला पाच विकेट्स घेण्याचा डाव

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून आपल्या फिरकीची जादू दाखवून देणाऱ्या या गोलंदाजाने कमबॅक केल्यापासून प्रत्येक सामन्यात लक्षवेधी खेळी करून दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेत तो आता भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवच्या पक्तींत जाऊन बसला आहे. गतवर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वरुण चक्रवर्तीनं आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १७ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या होत्या. आता इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने २४ धावा खर्च करताना ५ विकेट्सचा डाव साधला. 

आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताकडून सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारे गोलंदाज

  • भुवनेश्वर कुमार- दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान
  • कुलदीप यादव- इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका
  • वरुण चक्रवर्ती - दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड
     

Web Title: India vs England 3rd T20I Varun Chakravarthy becomes the third Indian bowler to take multiple five-wicket hauls in T20I history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.