India vs England 3rd T20I Mohammed Shami In Playing 11 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेतील तिसरा टी-२० सामना राजकोट येथील सौराष्ट् क्रिकेट असोशिएशनच्या निरंजन शहा स्टेडियमवर रंगला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हॅटट्रिकसह मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. दुसरीकडे पाहुण्या इंग्लंड संघासा मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोहम्मद शमीची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवनं पुन्हा नाणेफेक जिंकली अन् पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय कायम ठेवला. भारतीय कर्णधारानं नाणेफेक जिंकल्यावर संघ एका बदलासह मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. अर्शदीप सिंगला विश्रांती देऊन मोहम्मद शमीला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिल्यांदा तो टीम इंडियाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे.
तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन
Web Title: India vs England 3rd T20I Team india captain won the toss and have opted to field Mohammed Shami In Playing 11
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.