'हार के जीतने वाला बाजीगर'! वर्ल्ड रेकॉर्ड सेट करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला 'मॅन ऑफ द मॅच'

त्याचा विकेट घेण्याचा पॅटर्नही एकदम खास अन् मॅचला कलाटणी देणारा ठरतो. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 23:43 IST2025-01-28T23:41:32+5:302025-01-28T23:43:15+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd T20I Mohammed Shami International Return Was Dull Varun Chakravarthy Break Ajantha Mendis World Record Also Earned Man of the Match After Team India Loss | 'हार के जीतने वाला बाजीगर'! वर्ल्ड रेकॉर्ड सेट करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला 'मॅन ऑफ द मॅच'

'हार के जीतने वाला बाजीगर'! वर्ल्ड रेकॉर्ड सेट करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला 'मॅन ऑफ द मॅच'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 राजकोटच्या मैदानात सर्वांच्या नजरा या जवळपास ४३६ दिवसांनी मैदानात उतरणाऱ्या मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सर्वांच्या नजरा होत्या. पण  कमबॅकच्या सामन्यात त्याच्या हाती एकही विकेट लागली नाही. दुसरीकडे मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीनं पुन्हा एकदा आपल्यातील धमक दाखवून दिली. शाहरुख खानच्या  केकेआरच्या ताफ्यातून स्टार होऊन टीम इंडियात वर्णी लागल्यावर तीन वर्षे संघाबाहेर राहण्याची वेळ आलेला वरुण चक्रवर्ती पुन्हा कमबॅक केल्यापासून सातत्याने विकेट्स घेताना दिसतोय. त्याचा विकेट घेण्याचा पॅटर्नही एकदम खास अन् मॅचला कलाटणी देणारा ठरतो.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

त्यानं सर्वोत्तम कामगिरी केली, पण टीम इंडिया ठरली अपयशी

पण यावेळी दुसऱ्यांदा पाच विकेट्सचा पराक्रम करूनही संघावर पराभवाची नामुष्की ओढावली.  भारतीय संघानं मॅच गमावली पण सर्वोत्तम कामगिरीसह वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वरुण चक्रवर्तीसाठी या सामन्यात तो ज्या फ्रँचायझी संघाकडून खेळतो त्या शाहरुख खानच्या चित्रपटातील लोकप्रिय डायलॉग "हार के जीतने वाले को बाजीगर कहते है" हा सीन पाहायला मिळाला. कारण संघ पराभूत होऊनही त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.

वरुण चक्रवर्तीचं चक्रव्यूव्ह 

एका बाजूला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिला आंतरारष्ट्रीय सामना खेळणारा  अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी ट्रॅकवर येण्यासाठी संघर्ष करताना दिसला. दुसरीकडे वरुण चक्रवर्तीनं पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. इंग्लंडचा अर्धा संघ त्याने तंबूत धाडला. ४ षटकात २४ धावा खर्च करत त्याने ५ विकेट्स घेतल्या. दुसऱ्यांदा त्याने अर्धा संघ तंबूत धाडण्याची कमागिरी करुन दाखवली. 

अजंता मेंडिसचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

एवढेच नाही तर वरुण चक्रवर्तीनं इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातील दमदार गोलंदाजीसह श्रीलंकेचा माजी फिरकीपटू अजिंता मेंडिस याचा विश्व विक्रमही मोडीत काढला. चक्रवर्ती आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सलग १० डावात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत चक्रवर्तीनं २७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. याआधी हा रेकॉर्ड मेंडिसच्या नावे होता. सलग १० डावात त्याने २६ विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव २५ विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

Web Title: India vs England 3rd T20I Mohammed Shami International Return Was Dull Varun Chakravarthy Break Ajantha Mendis World Record Also Earned Man of the Match After Team India Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.