इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ अर्शदीप सिंगशिवाय मैदानात उतरला. भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन पाहिल्यावर त्याच्याशिवाय पॉवर प्लेमध्ये कोण आपली पॉवर दाखवणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण इंग्लंडच्या सलामीवीरांना या संधीच काही सोनं करता आलं नाही. फिल सॉल्ट पुन्हा एकदा दुहेरी आकडा न गाठता तंबूत परतला. अर्शदीप सिंगच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने पाहुण्या संघाला पॉवर प्लेमध्ये धक्का देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"जोर का झटका धीरे से "
हार्दिक पांड्यानं आपल्या पहिल्या आणि इंग्लंडच्या डावातील दुसऱ्याच षटकात भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिले. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चौकारानं खाते उघडणारा फिल सॉल्ट ७ धावांची भर घालून तंबूत परतला. हार्दिक पांड्यानं स्लोवर चेंडूवर इंग्लंडच्या सलामीवीराला चकवा दिला. हा सीन पाहुण्या संघाला "जोर का झटका धीरे से " असाच काहीसा होता.