आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंतच्या मालिकेत टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडनं टॉसनंतरचा पॅटर्न बदलल्यावर रोहित शर्मानं आम्हाला हेच हवं होतं असं म्हणत नाणेफेक जिंकली असती तर आम्ही बॅटिंगच करणार होते, असे म्हटले. पण कटकमध्ये दमदार शतकी खेळी करणारा रोहित शर्मा आपल्या बॅटिंगची झलक या सामन्यात दाखवू शकला नाही. २ चेंडूत अवघ्या एका धावेवर तो तंबूत परतला. एका सामन्यात शतकी खेळी आल्यावर त्याने लगेच तलवार म्यान केल्यासा सीन अहमदाबादच्या इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात पाहायला मिळाला.
पहिल्या षटकात बॅटनं आली फक्त एक धाव
नाणेफेक गमावल्यावर भारतीय संघाकडून नियमित सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलनं डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात या जोडीनं ६ धावा घेतल्या. यात रोहित शर्मानं पहिल्याच चेंडूवर घेतलेली एक धाव आणि वाइड बॉलवर अवांतर धावसंख्येच्या रुपात मिळालेल्या चार धावा अशा पाच धावांचा समावेश होता. दोन्ही संघाकडून बरोबरीची सुरुवात झाल्याचा सीन या षटकात पाहायला मिळाला.
मार्क वूडच्या पहिल्याच चेंडूवर फसला रोहित, सॉल्टनं यष्टीमागे टिपला अप्रतिम झेल
कटकच्या मैदानातील फॉर्म कायम ठेवून रोहित शर्मा जगातील सर्वात मोठं मैदान गाजवेल, अशी अपेक्षा होती. पण यावेळी त्याचा डाव फसला. भारताच्या दुसऱ्या डावात जोस बटलरनं चेंडू मार्क वूडच्या हाती सोपवला. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला चकवा दिला. मार्क वूडनं अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. टप्पा पडल्यावर चेंडू आउट स्विंग झाला अन् रोहितच्या बॅटची कड घेऊन यष्टीमागे गेला. सॉल्टनं कोणतीही चूक न करता एक अप्रतिम झेल टिपला अन् भारतीय कर्णधाराचा खेळ दुसऱ्याच चेंडुवर खल्लास झाला.