अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंड संघासमोर ३५७ धावांचे टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले. या धावसंख्येचा पाठलाग करताना फिलिप सॉल्ट आणि बेन डकेट या इंग्लंडच्या सलामी जोडीनं पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलामी जोडीनं पहिल्या ६ षटकात १० च्या सरासरीनं कुटल्या धावा
अर्शदीपच्या पहिल्या षटकात फक्त एक धाव आली. पण त्यानंतर दोघांनी आक्रमक फटकेबाजीसह भारतीय गोलंदाजांचा समाचारच घेतला. ६ षटकात इंग्लंडच्या सलामीवीरांनी धावफलकावर ६० धावा लावल्या होत्या. या जोडीनं सलामीला सलग चौथ्यांदा ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचण्याचा खास रेकॉर्डही केला. ही जोडी फो़डण्याचं मोठं चॅलेंज उभा राहिलं असताना अर्शदीप सिंगनं भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिले. मोठा फटका मारण्याच्या नादत बेन डकेट फसला अन् कॅप्टन रोहित शर्मानं कोणतीही चूक न करता त्याचा सोपा झेल टिपला.
सलामी जोडी फोडण्यासाठी शिजला प्लान, अन् गळाला लागला मोठा मासा
इंग्लंडची सलामी जोडी फोडण्यात कॅप्टन रोहित शर्माच योगदान फक्त झेल घेण्या इतकेच मर्यादित नव्हते. त्याला आउट करण्यासाठी खास रणनिती आखण्यातही रोहितचा वाटा होता. तुफान फटकेबाजीच्या मूडमध्ये असलेल्या बेन डकेटला जाळ्यात अडकवण्यासाठी अर्शदीप सिंग आणि रोहित शर्मामध्ये आधी खास प्लान शिजला. "जोरात पळत ये अन् हळू बॉल टाक" अशी काहीशी आयडियाच कॅप्टन रोहित शर्मानं आपल्या गोलंदाजाला दिल्याचे दिसून आले. अर्शदीपनं हा फंडा आजमवला अन् बेन डकेटच्या रुपात मोठा मासा गळाला लागला.
रोहितच्या रिअॅक्शन अन् बेन डकेटसाठी रचलेला सापळा
बेन डकेटचा कॅच घेतल्यावर रोहित शर्मानं डोक लावून बॉलिंग टाकल्यावर कसा रिझल्ट मिळतो, ते सांगण्याचा प्रयत्न केला. अर्शदीप सिंगनं आक्रमक अंदाजात खेळणाऱ्या बेन डकेटला स्लोव्हर बॉलवर चकवा दिला. मोठा फटका खेळण्याच्या नादात असलेल्या बेनला चेंडू टाकताना अर्शदीप नेहमीच्या रनअप नुसार वेगाने धावत आला. पण हळवार चेंडू टाकत त्याने फलंदाजाला चकवा दिला. हीच विकेट नाही तर दुसरी विकेटही अर्शदीपलाच मिळाली. सॉल्टलाही त्याने स्लोव्हर डिलिव्हरी (हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू) वरच फसवल्याचे पाहायला मिळाले.