India vs England 3rd Lords Test Playing XI Jofra Archer : क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाने एकदिवस आधीच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. जवळपास चार वर्षांनी जोफ्रा आर्चर इंग्लंड संघाकडून कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. भारतीय संघासमोर कमकुवत ठरलेल्या गोलंदाजीला बळ देण्यासाठी यजमान संघानं आपला हुकमी एक्का बाहेर काढलाय. एक नजर टाकुयात कसा आहे त्याचा भारतीय संघाविरुद्धचा कसोटीतील रेकॉर्ड यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोफ्रा आर्चरची कसोटीतील कामगिरी; टीम इंडियाविरुद्ध किती सामने खेळलाय?
जोफ्रा आर्चरने आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. ४५ धावा खर्च करून ६ विकेट्स ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. टीम इंडियाविरुद्ध आतापर्यंत तो फक्त २ सामने खेळला असून त्याच्या खात्यात ४ विकेट्स जमा आहेत. ७५ धावा खर्च करून २ विकेट्स ही त्याची भारतीय संघाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडमध्ये त्याने ८ कसोटी सामने खेळले असून यात लॉर्ड्सच्या मैदानात तो एक सामना खेळला असून यात त्याने पाच विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
ICC Ranking : शुबमन गिलसह आकाशदीपची 'उंच उंडी'! जो रूटनं गमावला नंबर वनचा ताज टीम इंडियाविरुद्ध जोफ्राची आकडेवारी प्रभावी नाही, पण...
टीम इंडियाविरुद्ध जोफ्रा आर्चरची कामगिरी फारशी प्रभावी नाही. पण लॉर्ड्सच्या मैदानात गोलंदाजीसाठी अनुकूल खेळट्टीवर तो आपल्या वेगवाने माऱ्याने टीम इंडियाच्या फलंदजांना अडचणीत आणू शकतो. बऱ्याच दिवसांनी कमबॅक करत असल्यामुळे त्याला सेट होऊ न देता भारतीय फलंदाज त्याचा खरपूस समाचार घेण्याचा डाव साधणार का? ते पाहणे एकदम रंजक असेल.
टीम इंडियाविरुद्धच खेळला होता अखेरचा सामना जोफ्रा आर्चरने अखेरचा कसोटी सामना हा २०२१ मध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळला होता. अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यानंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. काउंटी क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध करून त्याने इंग्लंडच्या संघात कमबॅक केले आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ
जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, क्रिस वोक्स, ब्रायडेन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.