Join us

India vs England 2nd Test: शास्त्रीबुवा जाहिरात कसली करताय, संघाची कामगिरी सुधारा

India vs England 2nd Test: भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान असलेले रवी शास्त्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 10:13 IST

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान असलेले रवी शास्त्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. प्रशिक्षकपदाच्या यशापेक्षा त्यांच्या वर्तनाबद्दलचीच अधिक चर्चा सोशल मीडियावर रंगताना अनेकदा पाहायला मिळाली. इंग्लंड दौ-यावर असलेले शास्त्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि यावेळी नेटिझन्सने त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. 

एडबॅस्टन कसोटीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर शास्त्रींनी ट्विटरवर एका एनर्जी ड्रिंक्सची जाहिरात केली आणि त्यानंतर भारताच्या प्रशिक्षकपदांवर नेटिझन्स तुटून पडले. 'शास्त्रीबुवा जाहिरात कसली करताय, संघाची कामगिरी सुधारा,' असा खोचक सल्लाही काहींनी दिला. तर काहींनी बीसीसीआयकडे शास्त्रींना हटवण्याची मागणी केली. काय आहे हा व्हिडीओ ते पाहा... भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एका मुलाखतीत प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सकाळी शुद्धच नसते, असे खळबळजनक विधान केले होते.  

टॅग्स :रवी शास्त्रीभारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा