India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताची कामगिरी ही इंग्लंडपेक्षा सरस झालेली पाहायला मिळत आहे. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी फलंदाजीत कमाल दाखवताना भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. दुसऱ्या डावात त्यांनी गोलंदाजीतही कमाल केली. पण, विराट कोहलीनं एक झेल सोडल्यानं टीम इंडियाचं टेंशन वाढत चालले आहे. बुमराहच्या गोलंदाजीवर कर्णधार कोहलीनं स्लीपमध्ये जोस बटलरचा झेल सोडला अन् तोच बटलर खिंड लढवत आहे.
जसप्रीत बुमराह - मोहम्मद शमीच्या स्वागतासाठी संपूर्ण टीम ड्रेसिंग रुमच्या दाराजवळ आली अन्... Video
भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांच्या उत्तरात इंग्लंडनं ३९१ धावा केल्या. कर्णधार जो रूटनं नाबाद १८० धावांची खेळी करून इंग्लंडला २७ धावांची आघाडी मिळवून दिली. भारताची दुसऱ्या डावात सुरुवात निराशाजनक झाली. रोहित, विराट व लोकेश ५५ धावांवर माघारी परतले. त्यानंतर अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी केली. पाचव्या दिवशी जसप्रीत व मोहम्मद शमी यांनी बॅटीनं कमाल दाखवताना लॉर्ड्सवर ९व्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. विराटनं ८ बाद २९८ धावांवर डाव घोषित करून इंग्लंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले.India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
बुमराह व शमीनं त्यांच्या पहिल्या दोन षटकांतच इंग्लंडच्या सलामीवीरांना माघारी पाठवले. त्यानंतर इशांत शर्मानं दोन विकेट्स घेतल्या. बुमराहनं टी ब्रेकनंतर जो रूटला बाद करून भारताला मोठं यश मिळवून दिलं. इंग्लंडच्या ३४ षटकांत ५ बाद ८६ धावा झाल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी २६ षटकांत १८६ धावा करायच्या आहेत. त्यामुळे त्यांचा कल हा सामना अनिर्णित राखण्याकडेच आहे. भारताला विजयासाठी पाच विकेट्स घ्याव्या लागतील.