मुंबई - इंग्लंड कसोटी मालिकेत सलामीच्या फलंदाजांचे अपयश हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. दोन कसोटीत वेगवेगळी सलामीची जोडी उतरवूनही भारताला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. लॉर्ड्स कसोटीच्या दुस-या डावातही भरवशाचा सलामीवीर मुरली विजय भोपळा न फोडता माघारी परतला. दोन्ही डावांत विजयच्या धावांची पाटी कोरीच राहिली आणि अशी कामगिरी करणारा तो भारताचा सहावा फलंदाज ठरला आहे. 
इंग्लंडने दुस-या कसोटीत पहिल्या डावात 289 धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या पहिल्या डावातील 107 धावांच्या प्रत्युत्तरात यजमानांनी 7 बाद 396 धावांवर डाव घोषित केला. सॅम कुरनला ( 40) हार्दिक पांड्याने बाद करताचा इंग्लंडचा कर्णधार जो रूटने डाव घोषित केला. ख्रिस वोक्स 137 धावांवर नाबाद राहिला. वोक्सने 177 चेंडूंत 17 चौकार लगावत 137 धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात दोनशे धावांहून अधिक आघाडी घेतल्यानंतर 26 सामने जिंकले आहेत, तर सहाच लढती अनिर्णीत राहिल्या आहेत. त्यामुळे भारताची पराभव टाळण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. 
( India vs England 2nd Test: भारताची डावाने पराभव टाळण्यासाठी धडपड )
![]()
(India vs England 2nd Test: जेम्स अँडरसन; लॉर्ड्सवरील शतकवीर!)
भारताला दुस-या डावातही साजेशी सुरूवात करता आली नाही. जेम्स अँडरसनने तिस-याच षटकात विजयला बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. या विकेटसह लॉर्ड्सवर शंभरावा बळी टिपण्याचा मान अँडरसनने पटकावला. त्याशिवाय विजयला सर्वाधिक सात वेळा बाद करण्याचा पराक्रमही त्याने केला. त्यापाठोपाठ हा मान मॉर्ने मॉर्केल (6), रवी रामपॉल (5) आणि शेन वॉटसन व जोस हेझलवूड ( प्रत्येकी 4) यांचा क्रमांक येतो.