जसप्रीत बुमराहने 'दांडा' उडवला, हतबल बेन स्टोक्स बॅट फेकून उभा राहिला; विक्रम नोंदवला

India vs England 2nd Test Live Update : अक्षर पटेलने इंग्लंडचा स्टार फलंदाज झॅक क्रॉलीची विकेट घेऊन भारतासाठी पुनरागमाचे दार उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 04:06 PM2024-02-03T16:06:24+5:302024-02-03T16:06:34+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Live Update : WHAT A BALL BY JASPRIT BUMRAH, he becomes the fastest Indian pacer to take 150 Test wickets, Video | जसप्रीत बुमराहने 'दांडा' उडवला, हतबल बेन स्टोक्स बॅट फेकून उभा राहिला; विक्रम नोंदवला

जसप्रीत बुमराहने 'दांडा' उडवला, हतबल बेन स्टोक्स बॅट फेकून उभा राहिला; विक्रम नोंदवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test Live Update : अक्षर पटेलने इंग्लंडचा स्टार फलंदाज झॅक क्रॉलीची विकेट घेऊन भारतासाठी पुनरागमाचे दार उघडले आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह व कुलदीप यादवने  इंग्लंडला धक्के दिले. कुलदीपने ३ आणि जसप्रीतने ४ विकेट्स घेऊन भारताला सामन्यावर मजबूत पकड घेऊन दिली. जसप्रीतने आज कमालीचा स्पेल टाकताना भन्नाट यॉर्करवर ऑली  पोपचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर बेन स्टोक्सला निशब्द केला.. 


भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा उभ्या केल्या आणि यापैकी २०९ धावा या एकट्या यशस्वी जैस्वालच्या होत्या. अन्य फलंदाजांना मिळून फक्त १८५ धावाच करता आल्या. यशस्वीने २९० चेंडूंत १९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने २०९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत शुबमन गिल ( ३४ ) व रजत पाटीदार ( ३२) यांचा क्रमांक येतो.  इंग्लंडचे सलामवीर झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी दमदार सुरुवात करून दिली. कुलदीप यादवने इंग्लंडला ५९ धावांवर पहिला धक्का दिला आणि बेन डकेट ( २१ ) माघारी परतला. क्रॉलीने दुसऱ्या बाजूने जोरदार फटकेबाजी केली. पण, अक्षर पटेलने त्याची विकेट मिळवून दिली. क्रॉली ७८ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ७६ धावांवर झेलबाद झाला. श्रेयस अय्यरने अफलातून झेल घेतला. 


जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा यशस्वी फलंदाज जो रूट ( ५) याचा अडथळा दूर केला. बुमराहने त्याच्या पुढच्या षटकात ऑली पोप ( २३) माघारी पाठवून इंग्लंडला चौथा धक्का दिला. टी ब्रेकनंतर बुमराहने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला ( २५) बाद करून पाहुण्यांचा निम्मा संघ १५९ धावांत माघारी पाठवला. त्यानंतर कुलदीप यादवने पुन्हा कमाल केली व बेन फोक्सची ( ६) विकेट मिळवली. कुलदीपच्या चेंडूवर आक्रमक फटका मारण्याचा रेहान अहमदने ( ६) प्रयत्न केला, पंरतु शुबमनने तितकाच सुरेख झेल घेतला.


 पण, कुलदीपच्याच गोलंदाजीवर बेन स्टोक्सचा स्लीपच्या दिशेने वेगाने गेलेला चेंडू रोहितला टिपता आला नाही. २४ धावांवर स्टोक्सला जीवदान मिळाले. त्याचाच फायदा उचलून स्टोक्सने इंग्लंडवरील फॉलो ऑनची नामुष्की टाळली. पण, बुमराहने ही विकेट मिळवून दिली आणि त्याने स्टोक्सचा ( ४७) त्रिफळा उडवला. स्टम्प उखडताच स्टोक्सने बॅट फेकली अन् हताश होत हात उंचावले. बुमराहीची ही कसोटी क्रिकेटमधील १५० वी विकेट ठऱली आणि वकार युनिसनंतर ( २७) सर्वात कमी कसोटींत ( ३४) बुमराहने हा टप्पा ओलांडला. त्याने कपिल देव (३९) यांचा विक्रम मोडला. 

Web Title: India vs England 2nd Test Live Update : WHAT A BALL BY JASPRIT BUMRAH, he becomes the fastest Indian pacer to take 150 Test wickets, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.