Join us

अम्पायरने झेलबाद दिला, फलंदाजाने DRS घेतला; थर्ड अम्पायरने निर्णय बदलला अन् रोहित भडकला

India vs England 2nd Test Live Update : Bazball इथे चालणार नाही, हे भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला ठणकावून सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 13:57 IST

Open in App

 India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : Bazball इथे चालणार नाही, हे भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला ठणकावून सांगितले. यशस्वी जैस्वालचे (२०९) द्विशतक, शुबमन गिलचे ( १०४) शतक आणि जसप्रीत बुमराहच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने ३९९ धावांचे लक्ष्य उभे केले. इंग्लंडच्या फलंदाजांनी झटपट धावा करून भारतीयांची धाकधूक वाढवली होती, परंतु गोलंदाजांनी सातत्याने धक्कासत्रही कायम राखल्याने सामना रोमहर्षक वळणावर होता. बेन फोक्स व टॉम हार्टली यांनी आठव्या विकेटसाठी कडवी टक्क देताना पुन्हा पोटात गोळा आणलेला. त्यात मैदानावरील अम्पायरने झेलबाद दिले होते, पण टॉम हार्टली तिसऱ्या अम्पायरकडे गेला अन् निर्णय बदलला.. त्यावरून रोहित भडकला... 

भारताच्या ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा बॅझबॉल फेल गेला. समोर ६०० धावा जरी असल्या तरी आक्रमक खेळायचा असा मंत्रा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने दिला होता. इंग्लंडच्या फलंदाजांनी तसा खेळ केला, परंतु भारतीय गोलंदाजांच्या सापळ्यात ते अडकले. झॅक्र क्रॉली आणि बेन डकेट ( २८) यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. पण, आर अश्विनने ही जोडी तोडली. नाईट वॉचमन रेहान अहमदनेही ( २३) चांगले फटके खेचले, पंरतु अक्षर पटेलच्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी रांग लावली. आर अश्विनने ऑली पोप ( २३) व जो रूट ( १६) यांना माघारी पाठवले. पण, यात झॅक क्रॉली शड्डू ठोकून उभा होता व त्याने दुसऱ्या डावातही अर्धशतक पूर्ण केले. 

बेन स्टोक्स व बेन फोक्स ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवेल असे वाटत होती, परंतु श्रेयस अय्यरने भन्नाट डायरेक्ट हिट करून स्टोक्सला ( ११) रन आऊट केले. स्टोक्स व फोक्स जोडीने ६० चेंडूंत २६ धावा जोडल्या.  इंग्लंडला २२० धावांवर सातवा धक्का बसला आणि आता भारताचा विजय पक्का मानला जातोय. इंग्लंडला अजून १७७ धावा करायच्या आहेत. हार्टली व फोक्स यांनी ५५ धावांची भागीदारी करून भारतीयांचे टेंशन वाढवले होते. त्यात अश्विनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा हार्टलीने प्रयत्न केला. रोहितने सुरेख डाईव्ह मारत चेंडू टिपला आणि झेलसाठी जोरदार अपील झाले. मैदानवारील अम्पयारने हार्टलीला बाद दिले.

याविरोधात इंग्लंडच्या फलंदाजाने DRS घेतला, त्याच्यामते चेंडू त्याच्या मनगटाला लागला होता. तिसरे अम्पायर पॉल रेफेलने तपासल्यानंतर खरंच चेंडू मनगटाला लागल्याचे दिसले. त्यानतंर त्यांनी LBW आहे का हेही तपासले आणि त्यात चेंडू बेल्सवर आदळत असल्याचे दिसले. विकेट व इम्पॅक्स यासाठी अम्पायर्स कॉल असल्याचे दिसले. तरीही मैदानावरील अम्पायरने निर्णय बदलला आणि हार्टली वाचला. यावरून रोहित व अश्विन मैदानावरील अम्पायरला सवाल करताना दिसले. हा DRS झेलसाठी असल्याने मैदानावरील अम्पायरचा निर्णय बदलावा लागल्याचे नंतर स्पष्ट झाले.    

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनरोहित शर्मा