जसप्रीत बुमराहच्या ९ विकेट्स! भारताने दुसरी कसोटी जिंकली, मालिकेत १-१ अशी बरोबरी

India vs England 2nd Test Live Update - भारतीय संघाने दुसरी कसोटी चौथ्या दिवशी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 02:18 PM2024-02-05T14:18:09+5:302024-02-05T14:18:34+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Live Update : Jasprit Bumrah gets the final wicket and India win the second Test by 106 runs, India level series by 1-1   | जसप्रीत बुमराहच्या ९ विकेट्स! भारताने दुसरी कसोटी जिंकली, मालिकेत १-१ अशी बरोबरी

जसप्रीत बुमराहच्या ९ विकेट्स! भारताने दुसरी कसोटी जिंकली, मालिकेत १-१ अशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : भारतीय संघाने दुसरी कसोटी चौथ्या दिवशी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. इंग्लंडच्या Bazballची हवा भारतीय गोलंदाजांनी काढून ही कसोटी १०६ धावांनी जिंकली. भारताच्या ३९८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगला खेळ केला होता, परंतु आर अश्विनने मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्या, त्यात जसप्रीत बुमराहने पुन्हा प्रभाव पाडला आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. या सामन्यात बुमराहने ( ४५/६ व ४६/३) एकूण ९ विकेट्स घेतल्या.  या कसोटीत यशस्वी जैस्वालचे ( २०९) द्विशतक अन् शुबमन गिलच्या ( १०४) शतकाने भारताला फलंदाजीत आधार दिला. 


समोर ६०० धावा जरी असल्या तरी आक्रमक खेळायचा असा मंत्र प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने दिला होता. इंग्लंडच्या फलंदाजांनी तसा खेळ केला, परंतु भारतीय गोलंदाजांच्या सापळ्यात ते अडकले. झॅक्र क्रॉली आणि बेन डकेट ( २८) यांनी आक्रमक सुरुवात करून दिली.  आर अश्विनने ही जोडी तोडली. रेहान अहमदने ( २३) अक्षर पटेलच्या चेंडूवर पायचीत झाला. आर अश्विनने ऑली पोप ( २३) व जो रूट ( १६) यांना माघारी पाठवले. झॅक क्रॉली चांगला खेळत होता आणि कुलदीप यादवने त्याचा अडथळा दूर केला. क्रॉली १३२ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ७३ धावांवर बाद झाला. बेन स्टोक्स व बेन फोक्स या जोडीने डोकेदुखी वाढवली होती, परंतु श्रेयस अय्यरने भन्नाट डायरेक्ट हिट करून स्टोक्सला ( ११) रन आऊट केले.  


फोक्स व टॉम हार्टली यांनी ५५ धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या आशा जीवंत राखल्या होत्या. पण, रोहितने लगेच जसप्रीतला गोलंदाजीला आणले आणि जसप्रीतने परतीच्या षटकात फोक्सला ( ३६) कॉट अँड बोल्ड केले. मुकेश कुमारने सामन्यातील पहिली विकेट घेताना शोएब बशीरला ( ०) माघारी पाठवले.  बुमराहने टॉम हार्टलीचा  (३६) त्रिफळा उडवून इंग्लंडचा डाव २९२ धावांवर गुंडाळला. जसप्रीतने ४६ धावांत ३ आणि अश्विनने ७२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

Web Title: India vs England 2nd Test Live Update : Jasprit Bumrah gets the final wicket and India win the second Test by 106 runs, India level series by 1-1  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.