Join us

'या' एका गोष्टीमुळे जसप्रीत बुमराह ठरला कसोटीमधील १०० वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज 

India vs England 2nd Test Live Update : भारत-इंग्लंड दुसरी कसोटी पहिल्या दोन दिवस यशस्वी जैस्वालचे द्विशतक अन् जसप्रीत बुमराहच्या सहा विकेट्समुळे गाजली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 09:56 IST

Open in App

India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : भारत-इंग्लंड दुसरी कसोटी पहिल्या दोन दिवस यशस्वी जैस्वालचे द्विशतक अन् जसप्रीत बुमराहच्या सहा विकेट्समुळे गाजली. भारताचे अन्य फलंदाज अडखळत होते, त्याचवेळी दुसरीकडे यशस्वी मैदानावर उभा राहिला आणि २०९ धावांची विक्रमी खेळी करून भारताला ३९६ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर जसप्रीतने इंग्लंडच्या फलंदाजांवर यॉर्करचा प्रहार केला. ऑली पोप व बेन स्टोक्स यांचे जसप्रीतने उडवलेले त्रिफळे सर्वांना अवाक् करणारे होते. इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गुंडाळून भारताने पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली.

इंग्लंडकडून झॅक क्रॉली ( ७६) आणि बेन स्टोक्स ( ४७)  हे चांगले खेळले. बुमराहने ४५ धावांत ६ विकेट्स घेतल्या. या शतकात भारतीय खेळपट्टीवर कसोटीत भारताच्या जलदगती गोलंदाजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. जसप्रीत बुमराहने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन येथे २७ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या आणि ती त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. त्यानंतर २०१८ मध्ये ६ बाद ३३ ( वि. ऑस्ट्रेलिया) या कामगिरीचा क्रमांक येतो. २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत त्याने ६१ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात आर अश्विनला एकही विकेट मिळाली नाही आणि त्याच्या कारकीर्दित पाचव्यांदा तो विकेटरहित राहिला. यापूर्वी २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने ५ षटकांत १९ धावा देताना एकही विकेट घेतली नव्हती.  १०० वर्षांत असा विक्रम झाला नाही...कसोटी क्रिकेटमध्ये किमान १५० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहची सरासरी ही सर्वोत्तम आहे. त्याने ३४ कसोटींत २०.२९च्या सरासरीने १५२ विकेट्स घेतल्या आहेत. एलन डेव्हिडसन यांनी ४४ सामन्यांत २०.५३च्या सरासरीने १८६ विकेट्स घेतल्या होत्या. १०० वर्षांपूर्वी सिडनी बार्नेस यांनी २७ सामन्यांत १६.४३ च्या सरासरीने १८९ विकेट्स घेतल्या होत्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराह