India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या विक्रमी भागीदारीनंतर रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. पण, त्यांना ती पेलवली नाही. लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी संयमानं इंग्लंडचा सामना करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी इंग्लंडला स्लेजिंगचा वापर करावा लागला, परंतु त्याचा फारसा फरक पडला नाही. जसप्रीत व शमीनं इंग्लंडच्या गोलंजादांची धुलाई केली. १० वर्षांपूर्वी राहुल द्रविड व अमित मिश्रा यांनी किंग्स्टन कसोटीत ९व्या विकेटसाठी जो पराक्रम केला तोच या जोडीनं आज करून दाखवला.
दुसऱ्या डावात टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते. लोकेश राहुल ( ५), रोहित शर्मा ( २१) व विराट ( २०) माघारी परतल्यानंतर अजिंक्य-पुजारा जोडीनं टीम इंडियाला सावरले. या जोडीनं २९७ चेंडूंत १०० धावांची भागीदारी केली. पुजारानं २०६ चेंडूंत केवळ ४ चौकारांसह ४५ धावा , तर अजिंक्यनं १४६ चेंडूंत ५ चौकारांसह ६१ धावा केल्या. रवींद्र जडेजा ( ३) धावांवर माघारी परतला. पाचव्या दिवशी रिषभने विकेट टाकली. तो २२ धावांवर माघारी परतला.
आता टीम इंडियाचा डाव झटपट गुंडाळला जाईल, असाच अंदाज होता. पण, जसप्रीत व शमी यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. त्यांची आत्मविश्वासपूर्णक फटकेबाजीपाहून लॉर्ड्सच्या बालकनीत बसलेला विराट कोहली भलताच खूश दिसला. नशीबानंही भारतीय जोडीला साथ दिली. इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडले. या दोघांनी नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली ( Fifty runs partnership between Bumrah and Shami for the 9th wicket.) १३ वर्षांनंतर SENA देशांमध्ये भारताकडून ९व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. यापूर्वी २००८मध्ये लक्ष्मण व आऱ पी सिंग यांनी हा पराक्रम केला होता.
शमीनं खणखणीत षटकार खेचून कसोटीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले.