Join us

India vs England 2nd Test: जॉनी बेअरस्टोने भारताची डोकेदुखी वाढवली

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी रंगतदार होईल अशी अपेक्षा होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 20:07 IST

Open in App

लॉर्ड्स - भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी रंगतदार होईल अशी अपेक्षा होती. मात्र पाच विकेट झटपट गेल्यानंतरही इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत कमबॅक केले. जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स या जोडीने इंग्लंडच्या डावाला आकार दिला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी करून संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. 

(India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या बचावासाठी 'बिग बी' मैदानात)दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना इंग्लंडच्या पाच प्रमुख फलंदाजांना माघारी धाडले. उपहाराचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडच्या 4 बाद 89 धावा झाल्या होत्या. भारताच्या पहिल्या डावातील 107 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 36 षटकांत 5 बाद 151 धावा केल्या होत्या. पण, बेअरस्टो आणि वोक्सने सामन्याचे पारडे पुन्हा इंग्लंडच्या बाजूने झुकवले. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा