इंग्लंड पाकिस्तानी वंशाच्या फिरकीपटूला संधी देणार; भारतीयाकडून घेतलंय ट्रेनिंग 

India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 05:01 PM2024-01-31T17:01:11+5:302024-01-31T17:01:33+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test : Jack Leach's participation in the second Test is uncertain due to a knee injury suffered in the first Test. Shoaib Bashir, a 20-year-old, might make his Test debut if Leach is unavailable. | इंग्लंड पाकिस्तानी वंशाच्या फिरकीपटूला संधी देणार; भारतीयाकडून घेतलंय ट्रेनिंग 

इंग्लंड पाकिस्तानी वंशाच्या फिरकीपटूला संधी देणार; भारतीयाकडून घेतलंय ट्रेनिंग 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test ( Marathi News ) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाने २८ धावांनी विजय मिळवला. आता मालिकेत २-०अशी आघाडी घेण्याकडे त्यांचे लक्ष आहे. पण, या सामन्यात प्रमुख फिरकीपटू जॅक लिच ( Jack Leach) याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्याजागी पाकिस्तानी वंशाचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरला ( Shoaib Bashir) संघात संधी मिळू शकते.


पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश नागरिक असलेल्या बशीरला व्हिसाच्या समस्येमुळे पहिल्या कसोटीसाठी वेळेत संघात सामील होता आले नव्हते. मात्र, युवा फिरकीपटूचा व्हिसाचा प्रश्न सुटला असून तो भारतात पोहोचला आहे. ''लिची हार मानणाऱ्यातला नाही. पण, तो दुसऱ्या सामन्यात खेळेल की नाही, याबाबत मी खात्रीशीर काहीच सांगू शकत नाही. त्याची दुखापत कितपत बरी झालीय, यानंतर निर्णय घेतला जाईल,''असे इंग्लंडच्या संघातील सदस्याने सांगितले.


हैदराबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना लिचला डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. तरीही त्याने पहिल्या डावात २६ आणि दुसऱ्या डावात १० षटके टाकली. बुधवारी सराव सत्रादरम्यान लिच लंगडताना दिसला, ज्यामुळे त्याला विशाखापट्टणममधील आगामी दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. लिचच्या अनुपस्थितीमुळे बशीरला संभाव्य कसोटी पदार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 
भारतीयाच्या मार्गदर्शनाखाली घडला बशीर.... 
शोएब बशीरच्या गुरूचे नाव सिद्धार्थ लाहिरी, जे भारतीय आहेत. ते इंग्लंडच्या रॉयल अकादमीचे प्रमुख आहेत. बशीर काउंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेटकडून खेळतो. त्याने सहा प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत १० विकेट्स घेतल्या आहेत.  

Web Title: India vs England 2nd Test : Jack Leach's participation in the second Test is uncertain due to a knee injury suffered in the first Test. Shoaib Bashir, a 20-year-old, might make his Test debut if Leach is unavailable.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.