ठळक मुद्देशतक झाल्यावर बॅट जशी झळकावतो, तशी त्याने हवेत झळकावली आणि कोहलीसह पुजाराही हसायला लागला.
लंडन : इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर सुरु असलेला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला. त्यापूर्वी भारताने दोन्ही सलामीवीर गमावले होते. खेळ थांबवला तेव्हा काही मिनिटांतच भारताचा कर्णधार विराट कोहली हसायला लागला. नेमके घडले तरी काय, याचा विचार सारेच करत आहेत.
खेळ थांबवल्यावर कोहली पॅव्हेलियनकडे जाण्यासाठी रवाना झाला. लॉर्ड्सवर थेट पॅव्हेलियनमध्ये जाता येत नाही. मैदानातून पॅव्हेलियनपर्यंत जातानाच्या अंतरामध्ये एक दालन लागते. तिथे काही मान्यवर व्यक्ती सामना पाहत असतात. कोहली आणि त्याच्याबरोबर पुजारा त्या दालनामध्ये दाखल झाले. तेव्हा दालनातील व्यक्ती टाळ्या वाजवत होते. कोहलीने तिथे आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत. पण तिथून पुढे गेल्यावर मात्र कोहलीने पुजाराबरोबर एक विनोद केला. शतक झाल्यावर बॅट जशी झळकावतो, तशी त्याने हवेत झळकावली आणि कोहलीसह पुजाराही हसायला लागला.
पाहा हा व्हिडीओ